संभाजी ब्रिगेडचा क्रांती दिनी रास्ता रोको
हिंगोली : जिल्ह्यातील चोंडी आंबा येथे संभाजी ब्रिगेड च्या वतीने आज ०९ ऑगस्ट “क्रांती दिनी” संकल्प प्रजाहिताचा..! एल्गार लोकक्रांतीचा..!! हे ब्रीद घेऊन संभाजी ब्रिगेड आयोजित “भव्य रास्ता रोको आंदोलन” वसमत औंढा महामार्ग, चोंडी आंबा फाटा या ठिकाणी मराठा आरक्षण, पिक विमा, हिंगोली जिल्ह्यात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करणे, या सहित विविध मागण्यां संदर्भात आंदोलन झाले. जिल्ह्यातील व परिसरातील सर्व शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रमुख मागण्या संदर्भात उपविभागीय अधिकारी साहेब यांच्या मार्फत मा. मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.
1) चोंडी स्टेशन ते कुरुंदा रोडवरील गेटवर दक्षिण मध्य रेल्वे च्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे जो काही पूल बांधला आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचून तो रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे. परिसरातील विद्यार्थ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी त्रास होत आहे.
2) राष्ट्रीय महामार्ग ते महागावात जाणारा रस्ता व त्यावरील सार्वजनिक बांधकाम विभागाचा पुल (पाटबंधारे विभाग) तात्काळ करणे बाबत.
3) भेंडेगाव ते आंबा जाणारा रस्ता व त्यावरील पुल करणे बाबत.
4) पांगरा बोखारे येथील गावात जाणारा रस्ता दुरुस्त करणे बाबत.
5) कोर्टा येथील गावात जाणारा रस्ता रस्तासाठी नवीन निधी मंजूर करून रस्ता चांगल्या दर्जाचा करणे बाबत.
6) चोंडी फाटा ते स्टेशनवर जाणारा रस्ताला नवीन निधी मंजूर करून दो पतरीकरण करणे बाबत.
7) कुरुंदा व परिसरातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार.? 8) मराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश करावा.
9)जिल्ह्यात पिक विमा 100% मंजूर करण्यात यावा.
10) जिल्ह्यात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा.
11) गिरगाव येथील गावात जाणारा रस्ता दुरुस्त करणे बाबत.
12) चोंडी स्टेशन गेट ते आंब्यात जाणारा जुना रस्ता रेल्वे ब्रिज मुळे बंद आहे तो पूर्ववत करण्या संदर्भात.
वरील विविध मागण्यांसाठी संभाजी ब्रिगेड हिंगोली जिल्ह्याच्या वतीने आज चोंडी रेल्वे स्टेशन फाटा या ठिकाणी भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. पोलीस स्टेशन कुरुंदा प्रशासनाचा चौक बंदोबस्त या ठिकाणी होता. आंदोलनानंतर संबंधित विभागाला संभाजी ब्रिगेडच्या वतीने निवेदन देण्यात आले. काही काळासाठी संभाजी ब्रिगेडच्या प्रमुख कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन काही काळानंतर सुटका करण्यात आली. या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात जनसमुदाय सहभागी झाला. व स्वत औंढा महामार्गावर वाहनांच्या मोठ्याच रांगाच रांगा लागल्या होत्या. पेपर साठी विद्यार्थ्यांना व अंबुलन्स साठी आंदोलनकर्त्याकडून सवलत देण्यात आली होती. बाकी कडेकोट बंदोबस्त हा आंदोलन यशस्वी पार पडले. यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सतीश पाटील महागावकर, जिल्हा उपाध्यक्ष सुरेशराव इंगोले, विधानसभा अध्यक्ष आलोकराव इंगोले, तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर माखणे, विजय डाढाळे, नारायण खराटे जिल्हा महासचिव, तालुका उपाध्यक्ष मारोती क-हाळे, नितीन भोसले, अदिनाथ भोसले, विकास नाना, शुभम भोसले, शिवाजीराव भोसले,अंगद व्यवहारे,धाराजी सोनटक्के,प्रसाद व्यवहारे , आकाश सोनटक्के,प्रताप व्यवहारे ,माधव सोनटक्के, जावेद शेख, विलास बोराडे,माधव व्यवहारे, कपिल सोनटक्के, सुभाष सोनटक्के,
गणेश भोसले, प्रल्हाद भोसले, गोलु भोसले, अंकुश भेंडेगावकर, करण जाधव, तोलाजी नरवाडे, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.