राज्यपालांच्या हस्ते न्यायज्योतीचे प्रकाशन
मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते चेंबूर येथील चेंबूर कर्नाटक विधी महाविद्यालयाच्या 'न्यायज्योती' या पहिल्या वार्षिक विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमाला चेंबूर कर्नाटक संघाचे अध्यक्ष एच. के. सुधाकरा, उपाध्यक्ष प्रभाकर बोलार व सी. एस. नाईक, मानद सचिव देवदास शेट्टीगर, विश्वस्त विश्वनाथ शेणवा, चेंबूर कर्नाटक विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या रश्मी ओझा, उपप्राचार्य संदीप सावलकर, प्रभारी प्राध्यापिका डॉ. प्रिया वीरेश प्रभू प्रामुख्याने उपस्थित होते.