सत्ता संघर्ष सुनावणी पुन्हा लांबणीवर !
22 आँगस्टला होणार सुनावणी
मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे)
महाराष्ट्रातील राजकीय सत्तासंघर्षावरील लढाई न्यायालयात चालू आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील सत्ता संघर्ष न्यायालयात चालू आहे. एकनाथ शिंदे बंड करून मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले. एकनाथ शिंदे गटातील आमदारांना अपात्र ठरविण्यात यावे यासाठी सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणाच भविष्य अवलंबून असलेल्या या खटल्याअसलेल्या केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर साऱ्या देशाचे लक्ष वेधले आहे. सर्वोच्च न्यायालयात १२ ऑगस्ट रोजी होणारी सुनावणी लांबणीवर गेल्याची माहिती मिळाली आहे. शिवसेनेकडून आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट यांच्या याचिकांवर महत्त्वाची सुनावणी १२ ऑगस्ट रोजी होणार होती. मात्र, आता पुढील सुनावणी २२ ऑगस्टला होणार आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सुनावणी सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. सरन्यायाधीश २६ ऑगस्ट रोजी निवृत्त होणार असल्याने त्यापूर्वीच या याचिकांचा निकाल लागणार की त्या घटनापीठाकडे सोपवल्या जाणार हे पुढील सुनावणीवेळी निश्चित होऊ शकतं.
महाराष्ट्रातील नव्या मंत्रीमंडळात अठरा सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. दुसऱ्या मंत्री मंडळ विस्तार कधी होणार हे निश्चित सांगता येत नाही. कदाचित पावसाळी अधिवेशनानंतर मंत्री मंडळ विस्तार अपेक्षित आहे. नव्या मंत्री दोन मंडळातील सदस्य संजय राठोड व अब्दुल सत्तार यांच्या निवडीमुळे विरोधक आक्रमक झालेले दिसत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना न्यायालयिन लढाई बरोबरच विरोधकांशी व त्यांच्या बरोबर आलेल्या सदस्यांशी लढावे लागत आहे.