‘इंद्रकुमार मेघवाल’ ला न्याय मिळण्यासाठी औरंगाबाद मधून निवेदना मार्फत दिली नवनिर्वाचित राष्ट्रपतीजींना हाक .
राजस्थान मधील जल्लोर जिल्ह्यातील सुराणा गावातील दलीत बालकाची जातीय द्वेषातुन हत्त्या करण्यात आली त्या केलेल्या हत्येच्या निषेध म्हणुन जिल्हा अधिकारी साहेबांन मार्फत महामहिम राष्ट्रपतीजी यांना निवेदन देण्यात आले.
राजस्थान मधील जालोर जिल्ह्यातील सुराणा गाव, येथील सरस्वती विद्या मंदिर स्कूल मधील इयत्ता तिसरीत शिकणारा 9 वर्षीय विद्यार्थी “इंद्रकुमार मेघवाल” याची “छैल सिंह” नामक शिक्षकाने ‘एका अनुसूचित जाती मधील विद्यार्थ्याने पिण्याच्या पाण्याला हात लावला म्हणून, जातिवाचक शिवीगाळ करून, क्रूर आणि अमानुष पद्धतीने 20 जुलै 2022 रोजी मारहाण केली.
सदर विद्यार्थी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आला, परंतु मृत्यू सोबत चाललेली त्याची झुंज अखेर संपली. अहमदाबाद मधील सिविल हॉस्पिटल मध्ये 13 ऑगस्ट रोजी इंद्रकुमार मेघवाल चा मृत्यू झाला, हा मृत्यू नसून हत्या आहे.
या घटने मुळे अशी भयानक परिस्थिती राजस्थान या राज्यांमध्ये अनुसूचित जाती व जनजाति समोर निर्माण झाली आहे. त्यामुळे जातीवादी शक्ती, संविधान विरोधी शक्ती व मानवता विरोधी शक्ती मोकाट फिरत असून त्यांच्यावर कायदा आणि सुव्यवस्थेचा कुठलाही धाक राहिलेला नाही.
गुन्हेगार छैल सिंहला फास्ट ट्रॅक कोर्ट द्वारा दोषी ठरवून फाशीची सजा सुनावण्यात यावी.
अनुसूचित जाती आणि जनजाति विरोधी राजस्थान मधील अशोक गेहलोत सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करावी.
मागण्याचा सहानुभूतीपूर्वक आणि न्यायिक दृष्टिकोनातून विचार करून इंद्रकुमार मेघवाल याला न्यायच द्यावा.
अन्यथा आजाद समाज पार्टी याद्वारे लोकशाही मार्गाने विविध स्वरूपात तीव्र आंदोलन करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी.
असे निवेदन जिल्हा अधिकारी साहेब मार्फत राष्ट्रपती यांना देण्यात आले.
या वेळी
महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आयु. सुनील वाकेकर सर – आजाद समाज पार्टी,
शहर जिल्हा अध्यक्ष आयु. राहुल मकासरेजी,
मराठवाडा प्रवक्ता आयु. पवण पाखरे जी,
जिल्हा उपाध्यक्ष आयु. विकास घोडके जी,
जिल्हा संघटक आयु. कपिल मोरे जी,
शहर सरचिटणीस आयु. प्रफुल डाळींबकर जी व
आयु. आकाश आव्हाड यु.शहर अध्यक्ष
आदी उपस्थित होते.