शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत यांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत यांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत यांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

कोल्हापूर महापालिकेचे शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत यांना केंद्राकडून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबडेकर नॅशनल एक्सलन्स ॲवॉर्ड २०२२ प्रदान

कोल्हापूर,दि.१८ (प्रतिनिधी) कोल्हापूर महापालिकेचे शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत यांना केंद्राकडून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबडेकर नॅशनल एक्सलन्स ॲवॉर्ड २०२२ जाहिर झाला होता. नॅशनल युथ फेडरेशन ऑफ इंडियाचे प्रतिनिधी डॉ.आदित्य सिंघानिया व न्यू दिल्ली आदिलीला फौंडेशनचे प्रतिनिधी डॉ.राम प्रभावळे यांनी गुरुवारी हा ॲवॉर्ड, मेडल, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन आयुक्त कार्यालयात त्यांचा सत्कार केला. प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे व अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार त्यांनी स्विकारला. यावेळी जल अभियंता हर्षजीत घाटगे, उपशहर अभियंता एन.एस.पाटील, नारायण भोसले, बाबूराव दबडे, प्रकल्प अधिकारी अरुणकुमार गवळी व कनिष्ठ अभियंता उपस्थित होते.कोल्हापूर महानगरपालिकेचे शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत यांना भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबडेकर नॅशनल एक्सलन्स ॲवॉर्ड २०२२ जाहिर झाला होता. हा पुरस्कार नवी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवार दि.१२ ऑगस्ट २०२२ रोजी केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड आणि डॉ.भारती पोवार, माजी केंद्रीय सचिव ज्ञानेश्वर मुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात येणार होता. हा पुरस्कार वितरण सोहळा न्यू महाराष्ट्र सदन भवनात येथे घेण्यात आला होता. परंतु या कालावधीत कोल्हापूर शहरात पुरपरिस्थिती निर्माण झालेने त्यांना या कार्यक्रमास उपस्थित राहता आले नाही, त्यामुळे हा पुरस्कार केंद्राच्यावतीने गुरुवारी देण्यात आला. शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत हे महापालिकेत ३१ वर्षे सेवा बजावत आहेत. कोरोना काळात तसेच शहरात आलेल्या २०१९ आणि २०२० च्या महापूरात त्यांनी उत्कृष्ट सेवा बजावली होती. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *