कबनूर नगरपरिषद कृती समितीच्या लोक लढ्याला यश लवकरच कबनूर नगरपरिषद होणार
नगर विकासाचे निवडणूक आयोगास पत्र
कबनूर -(प्रतिनिधी चांदुलाल फकीर) नगरपरिषद कृती समितीच्या लोक लढ्याला यश मिळून लवकरच कबनूर नगरपरिषदेची घोषणा होणार आहे त्यासंबंधी राज्याच्या नगर विकास विभागाने निवडणूक आयोगास पत्र पाठवून परवानगी मागितले आहे बुधवारी महाराष्ट्र शासनाचे उपसचिव अनिरुद्ध जेवळीकर यांनी सचिव राज्य निवडणूक आयोग मुंबई यांना या संदर्भात पत्र पाठवले आहे राज्य निवडणूक आयोगास पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की कबनूर ग्रामपंचायतचे नगर परिषदेमध्ये रुपांतर करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन असून त्याबाबतीत प्राथमिक उद्घोषणा करण्यासाठी माननीय निवडणूक आयोगाची सहमती देण्याबाबत आयोगास विनंती करण्यात येत आहे कबनूर नगरपरिषद कृती समितीच्या वतीने कबनूर नगरपरिषदेसाठी लोक लढा उभारला आहे अनेक वर्षांच्या लोक लढ्यानंतर आता नगरपरिषदेच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत या संदर्भात आमदार प्रकाशराव आवाडे यांनी चार दिवसापूर्वी स्पष्ट संकेत दिले होते प्राथमिक प्रक्रिया सुरू झाल्याने नागरिकातून समाधान व्यक्त होत आहे यासाठी माजी उपसरपंच निलेश पाटील, कबनूर नगरपरिषद कृती समितीचे अध्यक्ष दत्ता शिंदे, विकास फडतारे,उत्तम जाधव,रवींद्र धनगर, इमरान सनदी,शकील मुल्ला, राहुल महालिंगपुरे तसेच कृती समितीच्या सदस्यांनी हार न मानता येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर मात करून अखेर यश मिळवले .
Posted inकोल्हापूर
कबनूर नगरपरिषद कृती समितीच्या लोक लढ्याला यश लवकरच कबनूर नगरपरिषद होणार ; नगर विकासाचे निवडणूक आयोगास पत्र
