गुडाळ येथे बँक ऑफ इंडियाच्या सेवा केंद्राचे उद्घाटन!
गुडाळ वार्ताहर/ संभाजी कांबळे
गुडाळ तालुका राधानगरी येथील बँक ऑफ इंडियाचे सेवा केंद्र म्हणजे बँकेची मिनी ब्रँचच असून गुडाळ आणि परिसरातील बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांनी या केंद्रातून पैशाची देवघेव करण्याबरोबरच बँकेच्या अन्य योजनांचाही लाभ घ्यावा असे आवाहन बँक ऑफ इंडियाच्या आवळी बुद्रुक शाखेचे शाखाधिकारी चंद्रकांत त्रिभुवन यांनी केले.
गुडाळ (ता. राधानगरी) येथे बँक ऑफ इंडियाच्या ग्राहक सेवा केंद्राचे उद्घाटन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुडाळेश्वर विकास संस्थेचे चेअरमन इंद्रजीत पाटील हे होते.
उपस्थितांचे स्वागत प्रवीण वागरे यांनी केले.
या ग्राहक सेवा केंद्रातून ग्राहकांना देशभरातील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत पैसे हस्तांतरित करता येतील तसेच किसान क्रेडिट कार्ड, अटल पेन्शन योजना आणि प्रधानमंत्री विमा योजना मध्ये सहभाग घेता येईल अशी माहिती बँक ऑफ इंडियाचे प्रदीप कुमार यांनी यावेळी दिली.
या कार्यक्रमास आनंदराव माळवी, ए बी पाटील, संभाजीराव पाटील, शिवाजीराव अडसुळे, एम एस पाटील आदी मान्यवरासह ग्रामस्थ उपस्थित होते. आभार माणिक पाटील यांनी मानले.
फोटो ओळ- गुडाळ:- येथील बँक ऑफ इंडियाच्या ग्राहक सेवा केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी चंद्रकांत त्रिभुवन, इंद्रजीत पाटील, प्रवीण वागरे, आनंदराव माळवी आदी मान्यवर.!