महाराष्ट्र राज्य आशा व गट प्रवर्तक कर्मचारी कृती समिती वतीने आझाद मैदान मुंबई येथे हजारो आशा व गटप्रवर्तक महिलांचे प्रचंड धरणे आंदोलन यशस्वी
सर्व जिल्ह्यातील आशा व गटप्रवर्तक महिलांनी जोरदार घोषणा देऊन सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत आंदोलनामध्ये सहभागी होत्या. जिल्या जिल्यातून आलेल्या आशा व गटप्रवर्तक महिलांनी आपल्या भाषणातून प्रश्न मांडले. दुपारी कृती समितीचे शिष्टमंडळाने महाराष्ट्र राज्यचे आरोग्यमंत्री मा.ना.तानाजी सावंत, आरोग्य आयुक्त श्री तुकाराम मुंडे , आरोग्य अभियान संचालक अतंत्रिक श्री सरवदे वइतर अधिकारी यांचे सोबत मंत्रालयात चर्चा झाली.
आशा व गट प्रवर्तक महिलांना भाऊबीज भेट दिवाळीपूर्वी मिळण्यासंदर्भात मा. मुख्यमंत्री व उप मुख्यमंत्री महोदय यांचेशी विचार विनिमय करण्याचा व त्यांच्या सोबत कृती समितीची बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले. सदर विषय आर्थिक असल्याने त्वरित निर्णय घेता येत नाही असे म्हणाले.
तसेच गेल्या संप काळात आरोग्यमंत्री महोदय यांनी किमान वेतन बाबत आशा व गट प्रवर्तक च्या कामाचे मूल्यमापन करण्यासाठी यशदा मार्फत कमिटी करण्याचे आश्वासन दिले होते. या बाबत फाईल तयार आहे. कार्यवाही केली जाईल असे नमूद केले.
गटप्रवर्तक वेतन सुसूत्रीकरण बाबत विस्तृत चर्चा झाली. या बाबत अभ्यास करून भूमिका राज्य सरकारने घ्यावी. व गट प्रवर्तक महिलांवरील अन्याय दूर करावा. असे शिष्टमंडळाने सांगितले आहे. शहरी आशा व गटप्रवर्तक महिलांना प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र येथे दररोज सह्या करण्याची सक्ती संदर्भात पत्रक काढण्याचे आश्वासन दिले. इतर मागण्या बाबत लेखी उत्तर देऊ ही भूमिका घेतली.
या नंतर कृती समिती पदाधिकारी बैठक घेण्यात आली. बैठकीत वरील भूमिका घेऊन पाठपुरावा करावा. जर भाऊबीज भेट दिली नाही तर भाऊबीजे च्या दिवशी मा. मुख्यमंत्री महोदय यांना ओवळण्यासाठी आशा व गट प्रवर्तक जातील. तसेच आमदार, खासदार, मंत्री महोदय यांना राज्यभर आशा व गट प्रवर्तक ओवळण्याचे आंदोलन करून भाऊबीज मागतील असा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे. असे कृती समितीच्या वतीने कॉ एम ए पाटील, कॉ राजू देसले, कॉ सुमन पुजारी, कॉ श्रीमंत घोडके, कॉ आनंदी अवघडे, श्री भगवान देशमुख, सुवर्णा कांबळे, रंजना गारोळे व स्वाती धायगुडे यांनी प्रसिद्धीस दिलेले आहे.
Posted inसांगली
महाराष्ट्र राज्य आशा व गट प्रवर्तक कर्मचारी कृती समिती वतीने आझाद मैदान मुंबई येथे हजारो आशा व गटप्रवर्तक महिलांचे प्रचंड धरणे आंदोलन यशस्वी
