मराठी भाषेचे ग्रेट
महंननिय याना पुस्तकं भेट
भाषा ही शांती असते भाषा हा बंधुभाव असतो भाषा हा सदभावाचा संवेदनेचा संदेश असतो भाषा संस्कृतीचे वर्तमान असते भाषा संचित सभ्यतेचे शब्दाविष्काराचे रूप असते भाषा ही स्मृतीचा व कल्पनांचा खेळ असतो भाषा हा सांस्कृतिक व भाषिक भिन्नतेचा प्रकट रूप व्यवहार असतो म्हणून भाषा ही समाज जीवनात सभ्यता निर्माण करते भाषा शांती निर्माणचे काम करते अशा भाषेच्या अनेक उद्दिष्टांसाठी जेव्हाअश्या दृष्टीकोनाने आकलनानाने पुस्तक तयार होते तेव्हाच त्या पुस्तकात भाषेचे राजकारण भाषेचा सांस्कृतिक संघर्ष भाषिकांचा दुर्लक्षवाद भाषिकांचा अतिरेकी कलंकित स्मृती वाद हा शब्द बद्द होतो हे वाचकांनी जेव्हा अनेक अंगाने तपासून पाहिय ला पाहिजे अशी अपेक्षा लेखन कर्त्याची असते तेव्हा भाषेच्या सामर्थ्याचे गतिशील तेचे व वर्तमानाच्या प्रबोधनाचे महत्त्व प्रतीत होते प्रबोधन ही इतरांनी करायची गोष्ट असते असा भाषिकांचा समज असतो पण आधुनिक काळात स्वतःला वाचवण्यासाठी स्वयं प्रबोधनाची भाषिक चळवळ हे प्रत्येकाला या पुढे चालवावी लागेल हे केले गेले तरच जागतिकरणामध्ये मातृभाषांचे बोलीभाषांचे अपमृत्यू रोखता येतील अन्यथा जागतिकरण हे अनाकलनीय सपाटीकरण आहे ते संस्कृतीचे संमिश्रण स्वरूप आहे त्यामध्ये प्रभुत्व वर्ग हे आपल्या वसाहतवादी व अभिजनवादी सर्व वृत्ती प्रवृत्तींचे नैतिक व अनैतिकतेचे आग्रह लादणार आहेत ते लाद त आहेत
कलंकित व अपमानित स्मृतीचा बोजा भाषा ही वागविते भाषेतील हे.जाणीव राजकारण थांबविणे हे सम काळातील लेखकांचे असते पूर्वी हे काम होते आज हि काही प्रमाणात हे काम करावे लागत आहे. काहीजन अपकाल अर्थातच अध पतन काळ दाखवून देतात समाज चितक लोक समाजाला आवडत नाहीत
भाषेच्या प्रवासात हे सर्व व्यक्ती आणि समाज जीवनात पुढे चालत राहते भाषेचे हे ज्ञान भाषांतर व संस्कृती रूपांतरण याचे सम्यक भान समाजाचे टिकून ठेवणे हे भाषेचे कामच आहे प्रबोधनाच्या अवस्था या बाह्य सुधारकांच्या भूतकाळातील असतात त्या स्वीकारणे आणि वर्तमानाचा संभ्रम टाळणे हे समाजाला न पेरणारे काम असते समाज हा सुचित आदेशित संभ्रमित करून तो गतिशील करणे हे हेतू अनेकांचे असतात ही अवस्था वर्तमानामध्ये चालू आहे या अवस्थेला नाकारताना स्वयं प्रबोधनाची विवेकाच्या निवडीची व वर्तनाच्या स्वीकाराची नितांत आवश्यकता भाषा प्रतीत करते भाषा ही असे अनेक प्रकारचे मौलिक कार्य करते म्हणून प्रस्तुत कार्यकर्त्याने भाषेचे सांस्कृतिक राजकारण भाषेचे ज्ञान रूपांतरण भाषेचे स्वयंप्रबोधन साधन यातील फरक वाचकांना ज्ञान क्षेत्रातील प्रत्येकाला समजावा म्हणून भाषा विचार शिक्षण व प्रत्याभिज्ञा हे एक व दुसरे नवमत शिक्षण NEP 20 ही दोन पुस्तके
मराठी विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष संपादक डॉक्टर राजा दीक्षित व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे या दोन महननीय साहित्यिकांना 12 ऑक्टोबर 2022 रोजी मराठी विश्वकोश कार्यालयाच्या भेटीवेळी सह स्नेह सादर केली.
भारताचे थोर वैज्ञानिक राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम व हिंदू धर्माचे मी मासंक तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या स्मृति अभिवादनाच्या दिनी प्रसंगी वाचन प्रेरणा दिनाच्या सप्ताह निमित्त या दोन भाषा विचारकांना ही दोन पुस्तके भेट देणे हा विचार आनंद हा भाषा अभिव्यक्तीचा क्षण जपणे हे स्वयंम प्रबोधीत. होणे असते तो आनंद क्षण हा होय .
शिवाजी राऊत
सातारा 14 ऑक्टोंबर 22