गुडाळेश्वर सहकार समूहाचे संस्थापक ए डी पाटील यांना (सहकार रत्न) पुरस्कार प्रधान…
!!गोव्याचे मा.मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर व महाराष्ट्र राज्याचे आमदार निलेश लंके व केंद्रीय मंत्री रत्नमाला सावन्नूर यांच्या शुभहस्ते सहकार रत्न पुरस्कार प्रदान…!
गुडाळ वार्ताहर/ संभाजी कांबळे
गुडाळ तालुका राधानगरी येथील गुडाळेश्वर उद्योग समूहाचे संस्थापक माननीय ए डी पाटील यांना. बेळगाव येथे धर्मनाथ भवन अशोक नगर बेळगाव येथे (सहकार रत्न.) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . मा ए डी पाटील हे भोगावती सहकारी साखर कारखाना ज्येष्ठ संचालक म्हणून कार्यरत असून सहकार क्षेत्रामध्ये बहुमोलाचे योगदान, उल्लेखनीय नेत्रदीपक, आदर्शवत कामकाज,आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सहकार महर्षी म्हणून असणारी ओळख वउत्कृष्ट पद्धतीचे सहकार मध्येकाम केले बद्दल, बेळगाव येथील नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन बेळगाव यांच्या वतीने देण्यात येणारा आंतरराज्य सहकाररत्न पुरस्कार बहाल करण्यात आला.
यावेळी गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर महाराष्ट्राचे आमदार निलेश लंके केंद्रीय मंत्री रत्नमाला सावनूर यांच्या हस्ते करण्यात आला अमरसिंह पाटील बेळगाव आमदार संजय पाटील बेळगाव व कर्नाटक व इतर क्षेत्रांतील.. गुडाळेश्वर विकास सेवा सोसायटीचे माजी चेअरमन डॉक्टर ए बी माळवी. जी आर पाटील.तानाजी पाटील (नवाळे) बाजीराव माळवी व गुडाळेश्वर पतसंस्थेचे व्यवस्थापक डी जी पाटील.. पंडित पाटील. मारुती जाधव . बाबुराव पाटील अरविंद पाटील (टेलर)टी आर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते
फोटो ओळ: बेळगाव येथे सहकार रत्न पुरस्कार गौरव देताना गोव्याचे मा मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर आमदार निलेश लंके केंद्रीय मंत्री भारत सरकार रत्नमाला सावनूर पुरस्कार स्वीकारताना ए डी पाटील डॉक्टर ए बी माळवी डीजी पाटील बाजीराव माळवी आदी मान्यवर…
