उद्धव ठाकरेंची शिवसेना व काँग्रेस पक्षासोबत युतीचा प्रस्ताव संदर्भात बाळासाहेब आंबेडकरांनी केलेले विधान म्हणजे निव्वळ जनतेची दिशाभूल करणारे, पंडितभाऊ दाभाडे

उद्धव ठाकरेंची शिवसेना व काँग्रेस पक्षासोबत युतीचा प्रस्ताव संदर्भात बाळासाहेब आंबेडकरांनी केलेले विधान म्हणजे निव्वळ जनतेची दिशाभूल करणारे, पंडितभाऊ दाभाडे

उद्धव ठाकरेंची शिवसेना व काँग्रेस पक्षासोबत युतीचा प्रस्ताव संदर्भात बाळासाहेब आंबेडकरांनी केलेले विधान म्हणजे निव्वळ जनतेची दिशाभूल करणारे, पंडितभाऊ दाभाडे


पुणे दि. उद्धव ठाकरेंची शिवसेना व काँग्रेस पक्षासोबत युती करण्याचा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांचा दावा म्हणजे निव्वळ पोकळ असून त्यांचे विधान म्हणजे महाराष्ट्रातील मतदार आणि सामान्य जनतेची दिशाभूल करणारे असल्याचा आरोप बहुजन जनता दल संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांनी केला आहे.
वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी नुकतेच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे हिंदुत्व आम्हाला मान्य असून उद्धव ठाकरेंची शिवसेना व काँग्रेस पक्षासोबत युती करण्याचे संकेत देणारे विधान नुकतेच प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना केले बाळासाहेब आंबेडकर यांनी असे म्हटले की उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि काँग्रेस पक्षाकडून काही युती संदर्भात प्रस्ताव आल्यास आम्ही सुद्धा चर्चा करण्यासाठी तयार असून उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस पक्ष यांच्यापुढे एका प्रकारे युतीचा प्रस्ताव दिला आहे परंतु बाळासाहेब आंबेडकर यांनी वेळोवेळी अशा प्रकारचे विधान करून अनेक वेळा महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल केली आहे आता अशा विधानांना महाराष्ट्रातील कोणताही राजकीय पक्ष किंवा आंबेडकरवादी पक्ष बाळासाहेब आंबेडकरांच्या या विधानाला बळी पडणार नाही असेही बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांनी म्हटले आहे.
गेल्या विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकी च्या वेळी सुद्धा अशाच प्रकारचे विधान करून काँग्रेस पक्षासोबत युतीसाठी बाळासाहेब आंबेडकरांनी प्रस्ताव दिला होता दिलेल्या प्रस्तावावर दोन्ही पक्षाचे एकमत न झाल्याने युती झाली नाही बाळासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या प्रस्ताव या प्रस्तावामध्ये असे काही मुद्दे उपस्थित करण्यात येतात की दिलेल्या प्रस्तावावर युतीवर एक मत तर होत नाही तर दोन्ही पक्षांमध्ये चर्चा सुद्धा होत नाही मुळात बाळासाहेब आंबेडकरांना कोणत्याही पक्षासोबत युती करायची नसते फक्त दिशाभूल विधाने करून जनतेला असे दाखवायचे की आम्ही युतीसाठी तयार असून आणि पस्ताव सुद्धा दिला होता पण त्यांना आमचा प्रस्ताव मान्य नाही यामुळे आमची युती झाली नाही असा कांगवाही बाळासाहेब आंबेडकर करण्यात पटाईत आहे असेही बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांनी म्हटले आहे.
विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला मोठे खिंडार पाडून शिवसेनेचे 40 आमदार फोडून भाजपाच्या पाठिंबामुळे भाजप व शिंदे गट यांनी महाराष्ट्रात सत्ता हस्तगत केली यामुळे महाराष्ट्रात आता उद्धव ठाकरे यांची शिवसेना कमकुवत झाले आहे त्यामुळे उद्धव ठाकरे यांची शिवसेना महाविकास आघाडी मधून बाहेर पडणार नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची साथ ही ते सोडणार नाही कारण असे की शरद पवार देशाचे मुरब्बी नेते असून त्यांना राजकारणाची चांगल्या प्रकारे जानकारी आहे तेव्हा बाळासाहेब आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी राज्याच्या दोन तीन जिल्ह्यात प्रभावी आहे त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कदापही शरद पवार यांना सोडून बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी सोबत युती करणार नाही असेही बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांनी आपले मत व्यक्त केले
आगामी काळात महाविकास आघाडी कडून सुद्धा बाळासाहेब आंबेडकर यांना असा प्रस्ताव येऊ शकतो की आपणच महाविकास आघाडीमध्ये सहभागी होऊन एकत्रपणे निवडणूक लढवावी जर का असा प्रस्ताव महाविकास आघाडी कडून बाळासाहेब आंबेडकर यांना आल्यास बाळासाहेब आंबेडकरांनी त्या प्रस्तावाचे स्वागत करून आगामी विधानसभा मुंबई महानगरपालिका सह राज्यातील महानगरपालिका जिल्हा परिषद निवडणूक महाविकास आघाडीच्या सोबत सहभागी होऊन निवडणूक लढवून आपले उमेदवार निवडून आणून सत्तेत बसावे असा सल्लाही बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *