डॉ. जे. जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजीनिअरिंगच्या वतीने कुपोषित बालकांसाठी आरोग्य कॅम्पचे आयोजन
जयसिंगपूर – येथील डॉ. जे. जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजीनिअरिंगच्या ‘वुमन सेलच्या’ वतीने शिरोळ तालुक्यातील कुपोषित बालकांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालकल्याण विभाग- पंचायत समिती,शिरोळ व डॉ. जे. जे. मगदूम आयुर्वेद मेडिकल कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर पार पडले. शिबिरामध्ये शिरोळ तालुक्यातील शून्य ते सहा वयोगटातील मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली.यासाठी पाच तज्ञ डॉक्टरांची टीम नियुक्त करण्यात आली होती. एकूण १५० कुपोषित बालकांची आरोग्य तपासणी करून त्यांना प्रोटीन पावडर तसेच कॅल्शिअम व आयर्नच्या गोळ्यांचे वाटप करण्यात आले. सदर शिबिराचे आयोजन महाविद्यालयाच्या प्र.प्राचार्या डॉ.शुभांगी पाटील, वुमन सेलच्या समन्वयक डॉ. स्वालेहा अत्तार व प्रा. सौ.गुंडवडे प्रा. सौ.लठठे,सौ. स्वामी, सौ.वीणा पाटील तसेच कु. विशाखा सदरे, कु. श्रेया तांबट, कु. समर्था पाटील व त्यांच्या सहकारी विद्यार्थिनीनी केले. गटविकास अधिकारी मा. शंकर कवितके, सहा. गट विकास अधिकारी मा.प्रदीप पाटील, बालविकास प्रकल्प अधिकारी मा. संगीता गुजर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. संस्थाध्यक्ष डॉ. विजय मगदूम, उपाध्यक्षा ॲड. डॉ. सोनाली मगदूम, कॅम्पस डायरेक्टर डॉ. सुनील आडमुठे यांचे प्रोत्साहन लाभले.
Posted inBlog
डॉ. जे. जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजीनिअरिंगच्या वतीने कुपोषित बालकांसाठी आरोग्य कॅम्पचे आयोजन
