महाराष्ट्रातील सत्तर हजार आशा व गट प्रवर्तक महिलांना ABHA आरोग्य ओळखपत्र (कार्ड) काढण्याच्या जादा कामासाठी प्रत्येक ओळखपत्रसाठी पन्नास रुपये मोबदला द्या अन्यथा या कामावर बहिष्कार

महाराष्ट्रातील सत्तर हजार आशा व गट प्रवर्तक महिलांना ABHA आरोग्य ओळखपत्र (कार्ड) काढण्याच्या जादा कामासाठी प्रत्येक ओळखपत्रसाठी पन्नास रुपये मोबदला द्या अन्यथा या कामावर बहिष्कार


महाराष्ट्रातील सत्तर हजार आशा व गट प्रवर्तक महिलांना ABHA आरोग्य ओळखपत्र (कार्ड) काढण्याच्या जादा कामासाठी प्रत्येक ओळखपत्रसाठी पन्नास रुपये मोबदला द्या अन्यथा या कामावर बहिष्कार

महाराष्ट्रातील आशा व गटप्रवर्तक महिलांना यापूर्वीच 78 कामे कामावर आधारित नेमून देण्यात आलेली आहेत. तसेच गटप्रवर्तक महिलांना सुद्धा कामे नेमून देण्यात आलेली आहेत. 78 कामाशिवायही अनेक वेळा जिल्ह्यातील अनेक आरोग्य अधिकारी स्वतःच्या मनाला येईल ते काम आशा महिलांना करण्यास सांगतात. त्या कामाचा कसलाही मोबदला आशांना मिळत नाही.
उदाहरणार्थ काही जिल्ह्यांमध्ये तीन वर्षापूर्वी निवडणुकीमध्ये काम करून घेतलेले आहे. परंतु मोबदला अद्याप दिलेला नाही. अशाप्रकारे सर्वच जिल्ह्यामध्ये काम करून घेतलेले आहे पण कामाचा मोबदलाही अद्याप दिलेला नाही.
सध्या 78 कामे करणे साठीच आशा महिलांना दररोज आठ तासापेक्षा जास्त वेळ लागतो. शिवाय कामावर आधारित मोबदला मागील अनेक वर्षापासून वाढवण्यात आलेला नाही. अशातच ABHA कार्ड काढून देण्याबाबत आदेश आलेले आहेत. या कामासाठी एक कार्ड काढण्यासाठी दहा रुपये दिले जाणार आहेत. असे सर्कुलर मध्ये नमूद करण्यात आलेले आहे. परंतु हा मोबदला अत्यंत कमी आहे.
ABHA कार्ड ओळखपत्र काढण्याचे काम आशा महिलांनी करावे असे परिपत्रक सहसंचालक आरोग्यसेवा यांनी काढलेले आहे.परंतु आशा व गटप्रवर्तक महिला या राष्ट्रीय राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत काम करतात. त्यामुळे आशांना काम करण्याचा आदेश देणे सहसंचालक आरोग्य सेवा यांना अधिकार नाहीत. कारण राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आशांना हे काम देण्याबाबतचा आदेश काढलेला नाही.
इतकेच नव्हे तर आशा महिलांना अद्यापही मंजूर असूनही राष्ट्रीय आरोग्य अभियाना मार्फत अँड्रॉइड मोबाईल दिलेला नाही. आणि हे ABHA कार्ड काढण्याचे काम मोबाईलद्वारे करावे लागणार आहे.
इतकेच नव्हे तर सर्वच आशा महिलांना मोबाईलवर ABHA कार्ड काढून देणे शक्य नाही. परंतु आतापासूनच सर्क्युलर काढून अनेक जिल्ह्यातील आरोग्य अधिकारी हे काम केलेच पाहिजे असे आशांना सांगत आहेत.(माहितीसाठी ABHA ओळखपत्र काढण्याचे परिपत्रक पीडीएफ फाईल सोबत जोडलेली आहे)
महाराष्ट्र शासनाने संपूर्ण राज्यांमध्ये सरकारी अथवा खाजगी दवाखान्यात काम करणाऱ्या कामगारांच्यासाठी 14706 रुपये इतके दरमहा किमान वेतन घोषित केलेले आहे. या किमान वेतनानुसार 78 कामे करण्यासाठी आशा महिलांना किमान इतके वेतनानुसार मोबदला ठरवून देणे आवश्यक आहे.
त्यानुसार नोव्हेंबर व डिसेंबर 2022 मध्ये ABHA कार्ड काढून देण्यासाठी 29 हजार 412 रूपये इतकी रक्कम कार्ड काढण्यासाठी प्रत्येक आशा व गट प्रवर्तक महिलेस देणे कायद्यानुसार शासनावर बंधनकारक आहे. शिवाय कायद्याने जितके किमान वेतन लागू आहे ते किमान वेतन ओव्हर टाईम काम केल्यास दुप्पट द्यावे लागते.
त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य खात्यामार्फत महाराष्ट्र शासनाच्या किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी करून हे काम आशा महिलांच्या कडून करून घ्यावे.
ज्या आशा महिलांना शक्य होईल त्यांच्याकडूनच हे काम करून घ्यावे. कोणाही आशां महिलाना हे काम करण्याबाबत सक्ती करता येणार नाही.
तरी आशा व गट प्रवर्तक महिलांना ABHA ओळखपत्र काढून देण्याबाबत किमान वेतनानुसार मोबदला देण्याची मागणी करीत आहोत.
वरील आशयाचे निवेदन ईमेलद्वारे ता.२८/१०/२०२२रोजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्री व राष्ट्रीय आरोग्य अभियान संचालक यांना पाठविण्यात आलेले आहे. तरी याबाबत निर्णय न झाल्यास पुढील आंदोलनात्मक दिशा ठरवण्यासाठी 8 नोव्हेंबर रोजी ठीक सकाळी 11 वाजता सांगली निवारा भवन येथे आशा व गटप्रवर्तक महिलांचा महत्त्वाचा महत्त्वाचा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. तरी या मेळाव्यास जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित रहावे असे आवाहन करणारे पत्रक महाराष्ट्र आशा, गटप्रवर्तक व आरोग्य कर्मचारी युनियनच्या वतीने जनरल सेक्रेटरी कॉ सुमन पुजारी व युनियनचे अध्यक्ष कॉ शंकर पुजारी यांनी प्रसिध्दीस दिलेले आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *