संविधान हा महत्त्वाचा सामाजिक दस्तऐवज
ज्येष्ठ पत्रकार डी. एस.डोणे यांचे प्रतिपादन
इचलकरंजी ता. २७ ,भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते.त्यांनी निर्माण केलेले संविधान हा महत्वाचा सामाजिक दस्तऐवज आहे. ते सर्वांना समान हक्क,,लोकशाही, धर्मनरपेक्षता,सामाजिक न्याय , महिला व मागासवर्गीय समाजाला समान हक्कासाठी संधी उपलब्ध करून देते.आज राज्यघटनेची पायमल्ली होत आहे . ती थांबविण्या साठी आपण सर्व कार्यकर्तांनी घटनेने दिलेल्या अधिकाराचा वापर करणे आवश्यक आहे,असे मत ज्येष्ठ पत्रकार व आंबेडकरी चळवळीचे नेते डी.एस.डोणे यांनी व्यक्त केले.ते समाजवादी प्रबोधिनी व प्रबोधन वाचनालयाच्या वतीने आयोजित व्याख्यानात बोलत होते.संविधान दिनानिमित्त प्रबोधिनीच्या साप्ताहिक चर्चासत्रात ‘ संविधानाचे तत्वज्ञान ‘ हे व्याख्यान आयोजित केले होते.अध्यक्षस्थानी प्रबोधिनीचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तुकाराम अपराध होते.स्वागत व प्रास्ताविक प्रा.रमेश लवटे यांनी केले.
यावेळी राज्यघटनेच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.
यावेळी डी.एस. डोणे यांनी संविधानाची वाटचाल व त्याचे सार्वकालिक महत्व विषद केले.तुकाराम अपराध अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.त्यातून संविधानापुढील आव्हाने व आपली जबाबदारी याबाबतची मांडणी केली.आभार पांडुरंग पिसे यांनी मानले.यावेळी शशांक बावचकर,राहुल खंजिरे,अन्वर पटेल,नौशाद शेडबाळे, सचिन पाटोळे, महालिंग कोळेकर,अशोक मगदूम,शहाजी धस्ते,नारायण लोटके,शकील मुल्ला,मनोहर जोशी,अशोक माने,आनंद जाधव आदी उपस्थित होते.

