स्वातंत्र्याचा इतिहास नव्याने समजून घेणे कामाची गरज
——- प्रसाद कुलकर्णी
कवठेमहांकाळ ता.३० स्वातंत्र्याचा इतिहास नव्याने समजावून घेताना आजचे अस्वस्थ वर्तमान लक्षात घेणे ही काळाची गरज आहे. कारण आज स्वातंत्र्यलढा,प्रतिसरकार,संविधान आदींनी दिलेली मूल्यव्यवस्था बदलली जात असल्याचे मत जेष्ठ विचारवंत व समाजवादी प्रबोधनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांनी व्यक्त केले.ते कवठेमहांकाळ येथील पद्मभूषण वसंतराव पाटील महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या क्रांती अग्रणी जी.डी.बापू लाड यांच्या जन्मशताब्दी निमित्त व स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सव वर्षा निमित्ताने ‘सातारा जिल्ह्यातील प्रतिसरकारची क्रांतिकारी चळवळ ‘ याविषयावर बोलत होते.अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.एम.के.पाटील उपस्थित होते. यावेळेस प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ विचारवंत व्ही.वाय.पाटील,अनिसचे कवठेमहांकाळ तालुका अध्यक्ष दादासाहेब ढेरे प्रमुख उपस्थितीत होते.
प्रसाद कुलकर्णी म्हणाले, क्रांतिसिंह नाना पाटील,जी.डी.बापू लाड, नागनाथ अण्णा नायकवडी,पांडू मास्तर आदी अनेकांचे स्वातंत्र्याच्या आंदोलनात व प्रतिसरकार मोठे योगदान असून यांच्या विचारांची प्रेरणा घेणे आवश्यक आहे.प्रसाद कुलकर्णी यांनी आपल्या एक तासाच्या मांडणीत प्रतिसरकार,क्रांतिकारी चळवळ याची सखोल मांडणी केली.यावेळी प्रा.सुरेश पोळ, नेताजी पोळ, प्रा.डाॅ.आबासाहेब शिंदे,प्रा.टी.जी.पाटील,प्रा.विजय कोष्टी,प्रा.सुनिल तोरणे, प्रा.माळी सर,प्रा.निशिकांत वाघमारे, प्रा.एस.एस.कांबळे,प्रा.दिलीप गाडे, फारूक गंवडी, सचिन करगणे भगवान सोनंद,तानाजी थोरात,सचिन सोनवणे,सचिन पाटील यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक,कर्मचाऱीवर्ग,विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.स्वागत व प्रास्ताविक फारुक गवंडी यांनी केले. व्ही. वाय.पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.प्राचार्य डॉ.एम.के.पाटील यांनी अध्यक्षीय समारोप केला.
सुत्रसंचलन प्रा डाॅ.विनोद कांबळे यांनी केले.आभार प्रा.विनोद कांबळे यांनी मानले.

