
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे पहिले अधिवेशन कोल्हापूर येथे संपन्न होईल अशी अधिकृत घोषणा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदासजी आठवले यांनी आज मुंबई येथे झालेल्या पक्षाच्या महाराष्ट्र राज्य कार्यकरणीची बैठकीत केली.
लोकराजा छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी निमित्त, शाहू नगरीत म्हणजेच कोल्हापूर येथे हे अधिवेशन घेण्यात येईल असे यावेळी नाम.रामदासजी आठवले म्हणाले.
पक्षाच्या पहिल्या अधिवेशनाचा मान कोल्हापूरला मिळाल्या बद्दल कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष नाम.रामदासजी आठवले यांचा सत्कार पक्षाचे राज्य संघटक सचिव मा.प्रा. शहाजी कांबळे सर यांनी केला.
या प्रसंगी पक्षाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष उत्तमदादा कांबळे, महिला आघाडी प.महा.अध्यक्ष रुपाताई वायदंडे, राज्य सचिव मंगलराव माळगे, ज्येष्ठ नेते कुमार कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष दत्ता मिसाळ, कामगार आघाडीचे शहराध्यक्ष प्रदीप मस्के, गडहिंग्लज तालुका अध्यक्ष दिलीप jकांबळे, करवीर तालुका अध्यक्ष बाळासाहेब कांबळे, आदी नेते उपस्थित होते

