शालेय रोलर स्केटिंग क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन दीप पब्लिक स्कूल जयसिंगपूर येथे मोठ्या उत्साहात संपन्न
जयसिंगपुर – क्रीडा व युवक सेवा संचालन पुणे द्वारा आयोजित कोल्हापूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व कोल्हापूर मनपा व इचलकरंजी मनपा स्तर शालेय रोलर स्केटिंग क्रीडा स्पर्धेचे आयोजन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कोल्हापूर व अम्युच्यर कोल्हापूर जिल्हा रोलर स्केटिंग असोशियन यांच्या संयुक्त विद्यमानाने दिप पब्लिक स्कूल जयसिंगपूर येथे दिनांक २४ डिसेंबर २०२२ रोजी स्पर्धेसाठी ११, १४, १७ व १९ वयोगटातील मुले व मुली स्पर्धेसाठी तब्बल साडेतीनशे खेळाडूंनी सहभाग नोदविला होता
या स्पर्धेसाठी क्रीडा अधिकारी मा. श्री सुधाकर जमादार, शिरोळ तालुका स्पर्धा प्रमुख माननीय श्री धनाजी माने गावडे अनिल उर्फ पिंटू मगदूम फार्मसि कॉलेजचे प्राचार्य डॉ.एस. एन. निटवे, दीप पब्लिक स्कूलच्या प्राचार्या. सौ नमिता जैन,मुख्यध्यापिका सौ. विद्या मशाळकर यांच्या शुभ हस्ते उद्घाटन संपन्न झाले या वेळी
ट्रस्टचे अधिक्षक श्री.पी.एच. कुलकर्णी, कोल्हापूर रोलर स्केटिंग असोसिएशन सचिव व राज्य उपाध्यक्ष मा.श्री महेश कदम, भास्कर कदमउस. ॲड.धनश्री कदम, ऐश्वर्या बिरजे, तेजस्विनी कदम, एस कांबळे, दीप पब्लिक स्कूलचे क्रीडा शिक्षक श्री.विनय वनमोरे, राष्ट्रीय खेळाडू तेजस पाटील तसेच खेळाडू व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष डॉ.श्री.विजयराज मगदूम व उपाध्यक्षा ॲड.डॉ.सौ.सोनाली मगदूम यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
