धर्म नव्हे तर स्वराज्यरक्षक संभाजी महाराज
✍🏻 नवनाथ दत्तात्रय रेपे
repe9nat@gmail.com
छत्रपती संभाजी महाराज म्हटलं की, आठवतो तो त्यांचा रणधुरंदर पराक्रमी बाणा. एकही लढाई न हारलेला राजा म्हणून ज्यांची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने नोंद घेतली ते हेच छत्रपती संभाजी महाराज. ६ जून १६७४ रोजी संभाजी महाराजांचे संस्कृत विषयावरचे ज्ञान व त्यांची बुद्धीमत्ता पाहून गागाभट्ट देखील खुष झाला होता म्हणून तर त्याने काशीला परत जाताच छत्रपती संभाजी महाराजांना ‘समयनयन’ हा ग्रंथ अर्पण केला होता. पण आज ह्याच गागाभट्टाच्या गोत्रातील औलादी त्याच छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्य कर्तृत्वावर चिखलफेक करून त्यांची प्रतिमा डागाळण्याचे काम हे हरामी ब्राह्मण व आपल्यातील ब्राम्हणांचे बहुजनांतील चेले सतत करताना दिसतात. मग ते त्यांच्या लेखणीने कधी संभाजी महाराजांना व्यभिचारी तर कधी व्यसनी ठरवतात तर कधी ते केवळ धर्मासाठीच जगले आणि मेले असा बागुलबुवा उभा करून लोकांच्या मन आणि मस्तकात संभाजी महाराजांची धर्मांध प्रतिमा उभी करतात. पण ज्या संभाजी महाराजांना ज्यांच्या बापजाद्यांनी औरंगजेबच्या हवाली केले त्याच रंगनाथ स्वामीचे वारसदार आज धर्मवीर संभाजी, धर्मवीर संभाजी म्हणत बोंब मारताना दिसतात. त्या रामदासी पिलावळींना विचारावं वाटत की, ज्या रामदासी हास्तकांनी संभाजी महाराजांना पकडून देण्यासाठी औरंगजेबास मदत केली त्यांचा आणि संभाजी महाराजांचा धर्म कसा एक असू शकेल ? ज्यावेळी संभाजी महाराजांचा औरंगजेबने अतोनात छळ करून त्यांना संपवलं तेव्हा आजचा तो झंडू नावाचा धर्म तरी अस्तित्वात होता का ? तेव्हा जर हा धर्मच अस्तित्वात नव्हता तर मग संभाजी महाराजांनी कोणत्या धर्मासाठी आपलं बलीदान दिल बे रामदास्यानो ?
छत्रपती संभाजी महाराज हे संस्कृत पंडीत होते. त्यांना शाक्तवीर ही उपाधी लावली जाते कारण त्यांच्याच मतानूसार छत्रपती शिवाजी महाराजांनी दुसरा राज्याभिषेक २४ सप्टेंबर १६७४ रोजी ‘शाक्त राज्याभिषेक’ केला होता. हा दुसरा राज्याभिषेक करून छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज या पिता पुत्राने ब्राम्हणी धर्माची जळमटं गाडून नवा मानवतावादी संदेश दिला होता. पण ज्यांना धर्माधतेची खाज सुटते ते विनाकारण या महापुरुषांच्या नावाचा वापर करून धर्मांधतेची खाज खाजवत बसतात त्यांना थोडीच कुळवाडी भूषण शेतक-यांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज व ब्राम्हण मंत्र्यांना हत्तीच्या पायी देऊन संस्कृतीक दहशतवाद संपवणारे संभाजी महाराज पचणार आहेत ? ज्या छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचे विचार आणि कार्य नाकारूनही त्यांची लोकप्रियता कमी होत नसेल तर त्यांच्या चारित्र्यावर चिखलफेक करण्याचा प्रयत्न ह्या संघोट्यांकडून केला जातो. तरीपण जर त्यालाही न जुमानता लोकप्रियता मिळूच लागली तर मग अस्तित्वावर घाला घालून त्यांच्या कार्यपद्धीतीवर घाव घालून त्यांचे अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न ह्या वामनी किड्यांकडून वारंवार होत असतो. पण अशा रेशिमकीड्यांच्या पृष्ठभागावर आसूड ओढण्याचे काम मराठा सेवा संघ गेली ३० वर्ष झालं करत आहे. प्रत्येक वेळी ह्या वामनी आणि बामणी पिलावळी शिवचरित्रात रामदासाला घुसडून गाढवाचा सिंह करू पाहत होत्या पण त्या ‘रांड’दासाचे गाढवपण मराठा सेवा संघाने उघडे पाडून जसा गायीपासून गोचीड वेगळा केला जातो तसाच शिवचरित्रापासून रामदास वेगळा करून छत्रपतींच्या चारित्र्यावर लागलेला कलंक पुसण्याचे काम मराठा सेवा संघाने केले. पण जर का कोणता राजकारणी मराठा सेवा संघाची भाषा बोलून इतिहास मांडत असेल तर हे या मनुवाद्यांना थोडीच पचणार आहे ? म्हणून तर त्यांचे तोंड दाबून त्यांना बुक्यांचा मार देण्याचे काम ही त्यांची भक्ताड पिलावळ करते, मात्र त्यांची मराठा सेवा संघाच्या नादी लागायची औकात ती काय ?
संभाजी महाराजांना स्वराज्यरक्षक म्हटल्यास अनेकांचा पृष्ठभागात जळजळ होते. पण त्याला मराठा सेवा संघाचा वैचारिक सपट मलम योग्य व गुणकारी आहे हे त्यांनाच माहीत नाही कारण त्यांना प्रदीप जोशींच्या मलमा व्यतिरिक्त माहीती तरी काय आहे ? त्याच झालं असं की, राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते तर ते स्वराज्यरक्षक होते असं वक्तव्य केले. त्यानंतर सत्ताधारी, शिंदे गटाने अजित पवारांविरोधात जोरदार आंदोलन करत राजीनाम्याची मागणी केली. (टीव्ही ९ मराठी ०४ जाने २०२३) संभाजी महाराजांना स्वराज्य रक्षक म्हणताच अजित पवारांचा राजिनामा मागितला जात असेल तर मग छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणा-या सावरकरांचे पाय चाटणा-या फडणवीस व भगतसिंग कोश्यारींचा कडेलोट का करू नये ? अजित पवारांना खर बोलल्यास जर टार्गेट केलं जातं असेल तर भक्तांसमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा खोटा इतिहास सांगणा-या फडणवीस, कोश्यारींच्या व मनोहर कुलकर्णी यांच्या अंधभक्तांनी प्रदीप जोशी प्रमाणे पप्या का घेऊ नयेत ? संभाजी महाराजांना पकडून देण्याकामी औरंगजेबाला मदत करणारा रंगनाथ स्वामी हा फडणवीसांना अपेक्षित असलेल्या धर्माचा धर्मरक्षक का ठरू नये ? कृष्णा भास्कर कुलकर्णी ज्या धर्मासाठी लढला त्याला त्या धर्माचा धर्मरक्षक म्हणून मिरवायला काय फडणवीसांना लाज वाटते का ?
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा नायनाट होवो म्हणणारा रामदास कोणाच्या धर्मासाठी काम करत होता ? छत्रपती शिवाजी महाराजांवर पहिला वार करणारा कृष्णा भास्कर कुलकर्णी हा फडणवीसांच्या धर्माचा धर्मवीर का ठरू नये ? ब्राम्हण व संघोट्यांच्या मतानूसार जर संभाजी महाराजांनी धर्मासाठी आपल बलिदान दिलं तर मग तो धर्म वाचवण्यासाठी किती ब्राम्हणांनी आपलं बलिदान दिलं ? आज धर्म धर्म म्हणून बोंब मारणा-या किती ब्राम्हणांचे बापजादे धर्म वाचवण्यासाठी मेले आहेत ? इतिहासात धर्माच्या गांजासाठी कधीच बलिदान न देणारा हा ब्राम्हण वर्ग संभाजी महाराजांना धर्मावीर कशासाठी ठरवत आहे ? समजा जेव्हा संभाजी महाराज धर्मासाठी त्रास सहन करत असताना आज धर्मांच्या नावाने मलीदा चाखणारांचे बापजादे तेव्हा कुठे आणि कोणाचे उपटत बसले होते ?
विरोधीपक्ष नेते अजित पवारांनी छत्रपती संभाजी महाराजांचा उल्लेख धर्मवीर नाही तर स्वराज्यरक्षक असा केला होता. त्यावरून सत्ताधारी भाजपाने आक्रमक होत अजित पवारांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी लावून धरली होती. तेव्हा अजित पवार म्हणाले की, ‘महापुरुषांच्या विरोधात वारंवार केलेल्या अवमानजनक वक्तव्यांनी भाजपचे नेते बदनाम झाले आहेत. त्यावर पडदा टाकण्यासाठी माझ्याविरोधात हे आंदोलनाचे षडयंत्र रचले जात आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची महापुरुषांविषयीची वक्तव्ये, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री मंगलप्रभात लोढा तसेच आमदार प्रसाद लाढ, गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वक्तव्यांनी महापुरुषांचा वारंवार अपमान झाला आहे. याबाबत भाजपने अगोदर उत्तरे द्यावीत. मी कोणतेही बदनामी जनक विधान केले नाही. त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्न येत नाही.’ (लोकसत्ता ०५ जाने २०२३) कोश्यारी, सुधांशू त्रिवेदी, चंद्राकांत पाटील, मंगलप्रभात लोढा व गोपीचंद पडवळकर यांनी महापुरुषांची बदनामी करत ब्राम्हणांना निष्ठा दाखवत विष्ठेचे गोळे गिळंकृत केले तेव्हा हे भाजपचे आंदोलनजीवी कुठे बसले होते ? तेव्हा हे भक्त काय शामा प्रसाद मुखर्जी व प्रदीप जोशींच्या चड्डीचे ढिल्ले झालेले नाडे बांधत बसले होते का ? जेव्हा कोण महापुरुषांचा सत्य इतिहास मांडून आजच्या वास्तव परिस्थितीवर भाष्य करतो तेव्हा ह्या परशुरामवाद्यांच्या जांघेत जाळ का होत असेल ?
विरोधी पक्षनेते अजित पवार हे एका कार्यक्रमासाठी पुण्यात आले असता राष्ट्रवादी पुणे शहराच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे ढोल ताशे वाजवत स्वागत केले. तसेच त्यांच्या हस्ते ‘स्वराज्यरक्षक संभाजी महाराज’ अशा आशयाचे पोस्टर कार्यकर्त्यांच्या दुचाकीवर लावण्यात आले. (पोलिसनामा ०६ जाने २०२३) तसेच अजित पवार म्हणाले की, संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते तर ते स्वराज्यरक्षक होते या माझ्या विधानावर मी ठाम असून स्वराज्यरक्षक बिरुदात सर्व जाती-धर्म येतात, छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वराज्याचं रक्षण आणि विस्तार केला हे माझं मत प्रत्येकाला पटावंच असं नाही. छत्रपती संभाजी महाराज यांना स्वराज्यरक्षक म्हणतो, काही जण धर्मवीर म्हणतात पण राजे धर्मवीर नव्हते. त्यांनी कधी धर्माचा पुरस्कार केला नाही, मी माझी भूमिका मांडली आहे, ज्यांना योग्य वाटते त्यांनी ती स्वीकारा, आणि ज्यांना योग्य वाटत नाही त्यांनी ती सोडून द्या असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला. (टीव्ही ९ मराठी ०४ जाने २०२३) मा. अजित पवारांनी आपल्या मतावर ठाम राहीले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन कारण इतिहास संशोधक इंद्रजित सावंत देखिल म्हणाले की, ‘अजित पवारांनी संभाजी महाराजांचा अवमान केला नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज व राजाराम महाराज यांच्यात जो पत्रव्यवहार झाला त्यात मराठा राज्य, मराठा धर्म व महाराष्ट्र धर्म हा शब्द आलेला आहे.’
स्वराज्य रक्षक संभाजी महाराज या प्रकरणावर विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना शेख सुभान आली म्हणाले की, ज्या धर्माच्या लोकांनी मोगलांची चाकरी केली त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य खुपत होते. जर संभाजी महाराज धर्मासाठी मेले म्हणता तर मग छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेला बुद्धभूषणम हा ग्रंथ धार्मिक ग्रंथ म्हणून स्विकारणार का ? २०१८ मध्ये देवेंद्र फडणवीसाचे सरकार असताना सर्व शिक्षा अभियानांतर्गत दिल्या जाणा-या पुस्तकात सुभा साठे या लेखिकेने संभाजी महाराज दारूडे आणि बदफैली आहेत असं म्हटलं होतं त्यावर भाजपने काय कार्यवाही केली ? तसेच लातूर येथिल शास्त्री या लेखकाने ११ वी संस्कृतच्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नीचे नाव जिजाऊ लिहले तेव्हा हे लोक कुठे होते ? शिवराज्याभिषेकाला विरोध करणा-यांचा व अफजलखानाचा वकील कृष्णा भास्कर कुलकर्णीचा धर्म कोणता होता ? ह्या प्रश्नांची उत्तरे आजपर्यंत कोणी दिली नाहीत.’ असे प्रश्न जेव्हा बहुजनांतील लोक विचारून विकृत इतिहास मांडणा-यांचा खोटेपणा उघडा पाडतात तेव्हा बहुजनातील अनेक वामनी ‘वित्त’हासकारांच्या पृष्ठभागात जाळ होतो म्हणून तर ते अजित पवारांच्या वक्तव्यावर मुक्ताफळे उधळताना दिसतात त्यात पानिपत या कादंबरीचे लेखक अ(विश्वास ?) पाटील म्हणाले की, अमोल कोल्हे यांनी आपल्या फायद्यासाठी ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या नावाचा वापर केला. कायद्यानुसार शंभुराजांना ‘धर्मवीर’ या नावाने ओळखले जाते. (मटा ०५ जाने. २०२३) अमोल कोल्हे यांनी स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेतून जे वास्तव दाखवलं ते आपल्या पानिपत या कादंबरीत आहे का ? मराठा सेवा संघाने यापुर्वीच सांगितले की, कांदबरी कथा नाटक यातून इतिहास नव्हे काल्पनीक गोष्टी पेरल्या जातात त्यामुळे पानिपत या कादंबरीला आज घडीला कोण हुंगत नाही हे तुमचं दुखनं आहे का ? भिडेला स्टेजवर घेत घेत केव्हा तुमच्या डोक्यात किडे पडले हे तुम्हाला तरी समजले का ? कारण तुम्हालाच माणणारा व वाचणारा वर्ग तुमच्यावर अविश्वास दाखवताना दिसत आहे त्याच उत्तम उदाहरण म्हणजेच अमन पटेल हे फेसबुकवर म्हणतात की, ‘आडनाव, शासकीय पद याचा पुरेपूर वापर करून आणि स्वतःच्या भावाचे साहित्य चोरून जो “वितिहासकार” म्हणून प्रसिद्धीस आला त्याचा साहित्यिक “विश्वास” पार उघडा नागडा पडला.’
मराठा सेवा संघाचे पुरूषोत्तम खेडेकर म्हणतात की, ज्यांच्या मांडीवर डोके टेकवले त्यांनीच मान कापायची. भारतात अलीकडे अध्ययन अध्यपन लिखान वाचन ब्राह्मणांनीच केले. बहुजनांनी त्यावर विश्वास ठेवला, हे आमचे अज्ञान. पण आमच्या ज्ञानवंत ब्राम्हण लेखकांनी खोटेपणा लिहून देशद्रोह केला आहे.’ हे एकदम खरं आहे कारण संभाजी महाराज धर्मवीर होते तर मग धर्मांचा दिंडोरा पिटणा-या विनायक दामोदर सावरकराने आपल्या ‘हिंदूपदपातशाही’ या ग्रंथात संभाजी महाराजांविषयी चुकीचे विधान का केले ? सावरकर म्हणतो की, ‘संभाजी महाराजांमध्ये रागीट स्वभाव व मदिरा आणि मदिराक्षी ह्यांच्या विषयी अत्यंत असक्ती ह्या दुर्गुणांनी भर पडली होती !’ जर सावरकर आणि संभाजी महाराजांचा धर्म एकच असेल तर सावरकरांनी असे शेणाचे गोळे का खाल्ले ? कारण फ्रेंच इतिहासकार अबे कॅरेने हा संभाजी महाराजांविषयी म्हणतो की, ‘संभाजी महाराज छत्रपती शिवरायांप्रमाणेच चारित्र्यसंपन्न राजे आहेत.’ मग हे विश्वास पाटील यांना समजत नसेल तर त्यांनी इतिहासावर बोलण्यापेक्षा भिडे मास्तरच्या धोतरावर व्याख्याने द्यावीत ! पण इतिहासाचे विकृतीकरण करून संभाजी महाराजांना धर्मांध दाखवू नये. कारण खुद्द औरंगजेब बादशहा म्हणतो की, मेरे सब सरदारों के बजाय एक संभाजी मेरे पास होता तो हम कब के हिंदूस्थान के आलमगीर बन गये होते.’ चारित्र्यसंपन्न छत्रपती संभाजी महाराजांवर जर हे वामनी हस्तक चिखलफेक करून त्यांचे चारित्र्य कंलकीत करत असतील अन् आमच्यातील त्यांच्या ‘विश्वासा’मधील चेले आम्हालाच संभ्रमित करत असतील तर यांची खाकी हाफ चड्डी काढून त्यांच्या कांदब-याला थुंका लावून वाचण्याची गरजच वाटत नाही. म्हणून तर मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर म्हणतात की, ‘ज्या देशाच्या इतिहासात असा खोटारडेपणा पानोपानी जपल्या गेला असेल, त्या देशात गुलामांच्याच फौजा जन्माला येणार, हिजड्यांच्याच रांगा वाढणार. छत्रपती संभाजी महाराजांचे नाव उच्चारण्या एवढाही षौरूषत्व त्यांच्या अंगात उरणार नाही, ही समाजाची शोकांतिका आहे.’
शेवटी बहुजन समाजाला सांगावं वाटतं की, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक नाकारला त्यांच्या पिलावळी याच महापुरुषांच्या नावाचा वापर करून आपली झोळी भरून पोळी भाजत आहेत, कारण त्यांच्याकडे मते मागण्यासाठी आहे तरी काय ? ते शामा प्रसाद मुखर्जी, दिनदयाळ उपाध्याय किंवा नानाजी देशमुख यांचे नाव घेऊन मते मागितल्यास त्यांना हा समाज मत तर देणाराच नाही परंतू लाथ मात्र नक्की देईल म्हणून तर त्यांनी आमचे महापुरूष हायजॅक करून आपला स्वार्थ साधत आहेत. म्हणून तर सांगावं वाटतं की,
ते संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणतील तुम्ही स्वराज्यरक्षक वर अडून रहा,
ते विनायक सावरकरांना स्वातंत्र्यवीर म्हणतील तुम्ही माफीवीर वर अडून रहा !