प्रबोधिनीचे मासिक लोकप्रबोधनाचे महत्त्वाचे साधन

प्रबोधिनीचे मासिक लोकप्रबोधनाचे महत्त्वाचे साधन

प्रबोधिनीचे मासिक लोकप्रबोधनाचे महत्त्वाचे साधन

उद्यान पंडित गणपतराव पाटील यांचे मत

इचलकरंजी ता.१३, समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने प्रकाशित होणारे ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘ हे मासिक लोकप्रबोधनाचे एक महत्त्वाचे साधन आहे .या मासिकाद्वारे सातत्यपूर्ण पद्धतीने होणाऱ्या सामाजिक जनजागरणाची आज मोठी गरज आहे. प्रबोधनाचे हे काम अव्याहतपणे टिकून राहण्यासाठी प्रत्येक सुजाण व जिज्ञासू बंधू भगिनींनी या मासिकाचे वर्गणीदार वाचक होणे गरजेचे आहे ,असं मत श्री दत्त सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी व्यक्त केले.ते समाजवादी प्रबोधिनीच्या प्रबोधन प्रकाशन ज्योती मासिकाच्या चौतीसाव्या वर्षातील पहिल्या अंकाचे अर्थात जानेवारी २०२३ या अंकाचे प्रकाशन करताना बोलत होते.यावेळी गणपतराव पाटील यांनी समाजवादी प्रबोधिनीचे सातत्यपूर्ण काम आणि विविध उपक्रम यांचे कौतुक केले.

प्रारंभी या मासिकाचे संपादक व समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांनी समाजवादी प्रबोधिनीच्या कार्याची व या मासिकाच्या वाटचालीची वाटचालीची माहिती दिली. आचार्य शांताराम गरुड, प्रा.डॉ. एन.डी.पाटील, शहीद गोविंद पानसरे,प्रा.डॉ.जे.एफ.पाटील आदींसह सर्वांच्या योगदानाचा उल्लेख केला. आणि या मासिकाचे वर्गणीदार वाचक होण्यासाठी संपर्क साधावा असे आवाहन केले.दत्त कारखान्याच्या कार्यस्थळावर झालेल्या या प्रकाशन समारंभास अमर शिंदे (जिल्हा उपनिबंधक ,सहकारी संस्था कोल्हापूर ) प्रेम राठोड (सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था,शिरोळ ),नारायण परजणे (सहाय्यक निबंधक ,सहकारी संस्था पन्हाळा) बाळासाहेब पाटील (सहाय्यक निबंधक ,सहकारी संस्था ,करवीर ),युसुफ शेख( सहाय्यक निबंधक ,सहकारी संस्था, राधानगरी) आदसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *