एन डी पाटील यांना समाजवादी प्रबोधिनीत अभिवादन
———————————–_——
इचलकरंजी ता.१७ प्रा.डॉ.एन.डी.पाटील सर समाजवादी प्रबोधिनीचे संस्थापक सदस्य आणि अखेरची अकरा वर्षे अध्यक्ष होते. ज्येष्ठ विचारवंत , शिक्षणतज्ज्ञ,महाराष्ट्रातील सर्व पुरोगामी – प्रबोधन – विज्ञानवादी – साम्यवादी – विवेकवादी -चळवळीचे नेते, शेतकऱ्यांचे- वंचितांचे- कष्टकऱ्यांचे – सर्वहारा वर्गाचे तारणहार आणि आपल्या अफाट कार्यकर्तृत्वातून महाराष्ट्राच्या स्थापनेपासून महाराष्ट्राच्या जडणघडणीत अनमोल योगदान देणारे आणि महाराष्ट्राच्या राजकारणात व समाजकारणात नैतिक धाक व अंकुश म्हणून त्यांचा आदरपूर्वक उल्लेख करावा लागेल.सर्वांगिण समतेसाठी आयुष्य व्यतीत करणारे महान कृतीशील प्रज्ञावंत व्यक्तिमत्व म्हणजे एन.डी .पाटील .त्यांची पोकळी भरून काढणे अशक्य आहे.म्हणूनच त्यांचे विचारकार्य सामूहिकपणे नेटाने पुढे नेणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. त्यासाठी सर्व समतावादी कार्यकर्त्यांनी प्रबोधनाच्या चळवळीशी आपली सक्रिय बांधिलकी जपण्याची गरज आहे.असे मत समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांनी व्यक्त प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या पहिल्या स्मृतिदिनी समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने त्यांना आदरांजली वाहताना ते बोलत होते. प्रारंभी शशांक बावचकर व राहुल खांजिरे यांच्या हस्ते एन.डी .सरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी प्रा.रमेश लवटे, तुकाराम अपराध,पांडुरंग पिसे,सौदामिनी कुलकर्णी,अभिजित पटवा,सुनील बारवाडे,शिवाजी शिंदे,मनोहर जोशी,दादासाहेब जगदाळे पांडुरंग आगम,नौशाद शेडबाळे,महेंद्र माने,नंदा हालभावी ,अश्विनी कोळी आदी उपस्थित होते.
Posted inBlog
एन डी पाटील यांना समाजवादी प्रबोधिनीत अभिवादन
