नागपूर येथील बहादुरा फाटा येथे शिवसेना बाळासाहेबांची शाखेचे उद्घाटन
रजत डेकाटे //नागपूर प्रतिनिधी
नागपूर येथील बहादुरा फाटा येथे शिवजयंती निमित्त शिवसेना बाळासाहेबांची अर्थात एकनाथ शिंदे यांच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले.
रामटेक लोकसभा क्षेत्राचे खासदार श्री.कृपाल तुमाने व एकनाथ शिंदे यांचे जिल्हा प्रमुख संदिप इटकेलवार यांचे हस्ते या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. सर्व प्रथम शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण खासदार कृपाल तुमाने यांनी केले.
खासदार श्री. तुमाने यांनी
कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी अंकुश मेश्राम, सुरज गोजे, प्रविण पाटील, प्रसाद दारोंडे, राजेश पाटील, समीर वासनिक,
अमित घोडे, प्रणय जांभूळकर आदींची उपस्थिती होती.