पिंपरी चिंचवड शहर:-पँथर आर्म स्वराज्य क्रांती सेना या संघटनेच्या वतीने ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त भव्य शाखा उदघाटन आणि महिलांचा सन्मान कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाचे उदघाटक व मार्गदर्शक म्हणून संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष फिरोज मुल्ला(सर)हे उपस्थित होते त्यांनी महीलांचा सन्मान आणि सक्षमीकरण या विषयावर मार्गदर्शन केले. आप्पासाहेब कांबळे(राष्ट्रीय प्रभारी),डॉ. सतीश नगरकर(महाराष्ट्र सचिव),सौ.ज्योतीताई झरेकर(अध्यक्षा महिला आघाडी पिंपरी चिंचवड शहर),यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी प्रमुख पाहणे माजी नगरसेविका सौ.आशाताई सुर्यवंशी, माजी नगरसेवक संभाजी बारणे, उपस्थित होते तसेच राष्ट्रीय उपाध्यक्ष गुरु कुट्टी,महिला आघाडीच्या महाराष्ट्र कार्यध्यक्षा सौ.सिंधुताई तुळवे,महिला आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्र सचिव मंगलताई सोनवणे, पुणे जिल्हा महिला आघाडीच्या संपर्क प्रमुख सौ .विजयाताई खटाळ, शरनु नाटेकर अध्यक्ष पुणे जिल्हा,मुजफ्फर ईनामदार उपाध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर,अँड दिपावती पाटील सचिव महिला आघाडी पिंपरी चिंचवड शहर, चेतन निकाळजे युवा अध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर, आदी मान्यवर कार्यकर्ते महिला जनसमुदाय बहुसंख्येने उपस्थित होते..
Posted inपुणे
पॅंथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेच्या वतीने महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा
