सहा महिन्यात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारणार- आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर ; जयसिंगपूर एसटी स्टँडच्या आवारात पुतळ्याच्या जागेचे भूमिपूजन संपन्न

सहा महिन्यात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारणार- आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर ; जयसिंगपूर एसटी स्टँडच्या आवारात पुतळ्याच्या जागेचे भूमिपूजन संपन्न

सहा महिन्यात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारणार

आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर

जयसिंगपूर एसटी स्टँडच्या आवारात पुतळ्याच्या जागेचे भूमिपूजन संपन्न

जयसिंगपूर-
शब्दाचे राजकारण करणारा मी एक कार्यकर्ता आहे 2019 ची निवडणूक लढविताना जयसिंगपूर शहरात मध्यवर्ती ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे उभारणार अशी ग्वाही मी शिरोळ तालुक्यातील जनतेला दिली होती, शब्दाला जागणारा मी कार्यकर्ता असल्यामुळे येणाऱ्या सहा महिन्यात छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे उभे केले जातील असे प्रतिपादन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीच्या वतीने क्रांती चौक परिसरातील एसटी महामंडळाची जागा पुतळा उभारणीसाठी मागणी केली होती, गुरुवारी एसटी महामंडळाने संबंधित जागा जयसिंगपूर नगरपरिषदेकडे वर्ग केली असलेचे मंजुरी पत्र दिले, आणि शुक्रवारी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीचे औचित्य साधून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीच्या वतीने या जागेवर भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी आमदार राजेंद्र पाटील बोलत होते, राजकारणाच्या वेळी राजकारण पण विधायक कामाच्या वेळी एकत्र येण्याची परंपरा शिरोळ तालुक्याने अनेक वर्ष पाहिली आहे, देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार, स्वर्गीय शामराव आण्णा पाटील यड्रावकर, स्वर्गीय खासदार बाळासाहेब माने, स्वर्गीय आमदार दिनकररावजी यादव, स्वर्गीय आमदार सा.रे. पाटील या मंडळींनी अनेक वर्ष शिरोळ तालुक्याचे प्रतिनिधित्व केले, यांनीही राजकारण केले पण विधायक कामात कधी एकमेकाला मागे खेचताना पाहायला मिळाले नाही, राजकीय संघर्ष त्याही काळात होता परंतु तो काहीतरी चांगले करण्यासाठी होता, अलीकडच्या काळात चांगल्या कामाला सातत्याने आडकाठी आणण्याचे काम काही मंडळी करत आहेत ही बाब वेदनादायी आहे, मागील दोन अडीच वर्षात जवळपास 900 कोटी रुपयांचा निधी शिरोळ तालुक्याच्या विकासासाठी आणता आला याचा शिरोळच्या जनतेला आनंद आहे परंतु केवळ राजकारण करू पाहणाऱ्या मंडळींना याच्या वेदना होत आहेत ही बाब दुर्दैवी आहे असेही आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यावेळी म्हणाले, सुरुवातीला तथागत गौतम बुद्ध व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्प वाहून अभिवादन करण्यात आले, नियोजित पुतळ्याच्या जागेचे पूजन करून त्या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून फुले वाहण्यात आली, स्वागत बी. आर. कांबळे यांनी केले, यावेळी जागा मंजूर झाल्याबद्दल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीचे उपाध्यक्ष विजय पवार यांचा पुतळा समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने सन्मान करण्यात आला, वंचित आघाडीचे प्रमुख उत्तम वाघवेकर यांनी आभार मानले, यावेळी माजी नगराध्यक्ष बबन हातळगे, संभाजी मोरे, युनूस डांगे, रविद्र ताडे, बजरंग खामकर, राहुल बंडगर, अर्जुन देशमुख, बाळासाहेब वगरे,महेश कलकुटगी, राजेंद्र झेले, दादासाहेब पाटील चिंचवाडकर,शैलेश आडके, प्रेमला मुरगुंडे वासुदेव भोजणे, कुमार हातळगे, मिलिंद भिडे, रमेश यळगुडकर, विजय खातेदार, सुरेश कांबळे, आनंदा शिंगे, जयपाल कांबळे, अब्दुल बागवान, डॉक्टर सुभाष सामंत,अभिजीत आलासकर, संजय शिंदे, वैजनाथ हिरवे,अमरदीप कांबळे, राजू मांजर्डेकर, हुसेन शेख, रजनीकांत कांबळे, सूर्यकांत कांबळे, बाळासाहेब कांबळे,जॉन सकटे, माधुरी आलासकर, सुनिता पवार, रेशमा गायकवाड, सुलोचना कांबळे, मल्हारी सासणे, सुरज शेळके, संतोष सासणे, शिवाजी कांबळे, वंदना हिरवे, संजय कुरुंदवाडे, मिलन कांबळे, सागर सासणे यांच्यासह आंबेडकरवादी विविध संघटनांचे प्रतिनिधी मान्यवर व जयसिंगपूरचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *