सांगली निवारा भवन येथे बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

<em>सांगली निवारा भवन येथे बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन</em>

सांगली निवारा भवन येथे बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
निवारा बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष व ज्येष्ठ कामगार नेते कॉ शंकर पुजारी यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केल्यानंतर बोलताना सांगितले की, जग बदल घालुनी घाव सांगून गेले मला भीमराव हा शाहीर अण्णाभाऊ साठे यांचा संदेश आज वास्तवात उतरवण्याची आवश्यकता आहे, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या भारतीय घटनेचे शिल्पकार आहेत त्या घटनेवर प्रतिगामी व हिंदुत्ववादी सनातनी यांच्याकडून दररोज घाव घातले जात आहेत. भारतीय राज्यघटनेचे महत्त्वाचे तत्त्व म्हणजे धर्मनिरपेक्षवादी मूल्य. ते नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न भाजप सत्ताधाऱ्यांच्या कडून सध्या सुरू आहे. म्हणूनच या देशातील लोकशाही टिकवण्यासाठी व मजबूत करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार परत एकदा आपण गांभीर्याने खोलात जाऊन समजून घेणे आवश्यक आहे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू धर्मातील चातुरवर्णीय व्यवस्था व अमानुष जाती व्यवस्था यांचा कठोरपणे पर्दाफाश केला.आणि बौद्ध धम्माचा स्वीकार केला.
आज या देशामध्ये सत्ताधाऱ्यांच्याकडून मुस्लिम, आदिवासी व मागासवर्गीय यांच्यावर अत्याचार वाढत चाललेले आहेत. सत्तेचा वापर करून दंगली घडवून आणल्या जात आहेत. आणि यामध्ये सर्वसामान्य माणसांचा बळी घेतला जात आहे.
म्हणूनच आज या देशातील नागरिकांनी देशात एकात्मता टिकवण्यासाठी प्रयत्न करणे हेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भारताचे खरेखुरे स्वप्न साकार होण्यास मदत होणार आहे.
याप्रसंगी कॉ सुमन पुजारी, कॉ विशाल बडवे, कॉ सनम, शुभांगी तोळे, मुल्ला,कॉ वैभव बडवे, कॉ श्रुती नाईक, कॉ जहीद मोमीन, कॉ स्वलीया सौदागर व कॉ आदिती कुलकर्णी इत्यादी उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *