डॉ बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक भारताचे शिल्पकार . ॲड ममतेश आवळे
कुरुंदवाड येथील भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात मोठ्या उत्साहात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी प्रमुख व्याखते म्हणून बोलत असताना अड आवळे म्हणाले की .भारतीय रिझर्व्ह बँक नियोजन आयोग .महिलांना हकक अधिकार पगारी रजा.नदी जोड प्रकलप ह्या सर्व गोष्टी बाबासाहेबांनी मिळवून दिल्या तसेच स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय आणि मूलभूत अधिकार देणारी सर्वात उत्तम ज्यांनी घटना देऊन आधुनिक भारताचा पाया बाबासाहेबांनी रचला म्हणून ते आधुनिक भारताचे शिल्पकार आहेत..यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले यावेळी नगरसेवक उदय डांगे. भाई शंकरराव ढोणे भाईरामदास आवळे अजित मोरे सचिन कांबळे सचीनंद अवट्टी.प्रा विलास कांबळे बाबासाहेब आवळे अंनाप्पा आवळे युवराज गायकवाड यांची उपस्थिती होती सुत्र संचालन.अजित देसाई तर आभार.अप्पासाहेब बंडगर यांनी मानले