एक मे कामगार दिनानिमित्त सांगलीत बांधकाम कामगारांचा भव्य मेळावा संपन्न!
निवारा बांधकाम कामगार संघटना आयटकच्या वतीने आयोजित केलेल्या मेळाव्याचे प्रमुख पाहुणे बेळगावचे माजी प्राचार्य पुरोगामी विचारवंत कॉ आनंद मनसे यांनी बोलताना सांगितले की, एक मे कामगार दिनाची सुरुवात अमेरिकेत शिकागो येथे एक मे 1986 रोजी सुरू झाली. शिकागो मध्ये सुरू झालेले आंदोलन कामगारांना आठ तास पाळी व साप्ताहिक सुट्टी मिळावी यासाठी होते. परंतु अमेरिकेतील सर्व भांडवलदारानी कारस्थान करून जमलेल्या कामगारांच्या वर पोलिसांमार्फत गोळीबार केला. त्यामध्ये आठ कामगारांचा मृत्यू झाला. इतकेच नव्हे तर अमेरिकन सरकारने कामगार नेत्यांच्यावर खटले दाखल करून चार कामगारांना फाशी दिली. या त्यागाची आठवण म्हणून आणि जगातील कामगारांना एक व्हा यासाठी एक मे दीन संपूर्ण जगामध्ये साजरा केला जातो.
आज देशामध्ये कामगारांचे कायदेशीर हक्क संपवण्याचा प्रयत्न मोदी सरकार मार्फत सुरू आहे.चार लेबर कोर्ट कामगारांच्या वर लादून कामगारांना गुलाम करण्याचे प्रयत्न भाजपा सरकार मार्फत सुरू असून त्याविरुद्ध आंदोलन करण्याची आवश्यकता आहे.
मेळाव्यामध्ये दिल्ली येथे सुरू असलेल्या कुस्तीपटू महिलांच्या आंदोलनास पाठिंबा देण्याचा ठराव मेळाव्यामध्ये करण्यात आला. कुस्तीपटू खेळाडूंचे लैंगिक शोषण करणाऱ्या ब्रिज भूषण याना त्वरित अटक करून कडक कारवाई करावी असा ठराव करण्यात आला.
यानंतर बोलताना कॉ शंकर पुजारी आणि सांगितले की, सध्या फक्त सांगली जिल्ह्यामध्ये 35000 कामगारांचे नवीन नोंदणी, नूतनीकरण व लाभाचे अर्ज प्रलंबित आहेत. याबाबत अनेक वेळा कामगार मंत्री श्री सुरेश भाऊ खाडे यांना निवेदन देऊन सुद्धा काहीही फरक पडलेला नाही. कामगार मंत्री सांगली जिल्ह्याचे आहेत सांगली जिल्ह्यातच जर 35000 अर्ज प्रलंबित असतील तर संपूर्ण राज्यांमध्ये अत्यंत वाईट अवस्था आहे. याबाबतीत लवकरात लवकर नोंदीत बांधकाम कामगारांचे अर्ज निकाली नाही काढल्यास आंदोलनाची तयारी करावी लागेल.
निवारा बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने कामगारांची घरे मिळण्यास यश मिळू लागलेली आहे.उदाहरणार्थ सांगली शहरांमध्ये 357 बेघर कुटुंबीयांना घरकुले देण्यात येतील असे आश्वासन आठ दिवसापूर्वीच सा मी कु महानगरपालिकेच्या आयुक्तांनी दिलेले आहे. त्याचबरोबर मिरजेतील गोखले बिल्डर्स यांच्या भीमपलास प्रकल्पामध्ये 90 बांधकाम कामगारांना घरकुले मिळाले असून ज्या घरकुलाची बाजारभावाने किंमत 14 लाख रुपये होते असे ९० फ्लॅट्स बांधकाम कामगारांना अनुदान मिळाल्यामुळे सहा लाख रुपये मध्येच मिळालेले आहेत. त्याशिवाय सध्या ग्रामीण भागामध्ये नोंदीत बांधकाम कामगारांना दोन लाख रुपये अनुदान मिळण्यासाठी 44 अर्ज मंजूर झालेले असून त्यांना पहिला हप्ता लवकरच मिळेल.तसेच उर्वरित निवारा बांधकाम कामगार संघटनेचे 427 अर्ज मंजूर होण्याच्या प्रक्रियेमध्ये आहेत. तसेच सांगली जिल्ह्यामध्ये ज्या नोंदीत बांधकाम कामगारांना स्वतःचे घर बांधण्यासाठी जागा नाही त्यांना शासकीय निर्णयाप्रमाणे पाचशे स्क्वेअर फुट शासकीय जमीन मिळण्यासाठी लवकरच आंदोलन उभारण्यात येणार असून त्याबाबतचे अर्ज संघटनेच्या कार्यालयामध्ये स्वीकारण्यात येणार आहेत. यानंतर संघटनेचे सचिव कॉ विशाल बडवे यांनी सांगितले की एकल कुटुंबातील उदाहरणार्थ आई किंवा वडील ज्यांचे हयात नसतील अशा विद्यार्थ्यांना दरमहा अडीच हजार रुपये मिळण्याची योजना आहे. त्याचेही अर्ज मंगळवारपासून सांगली निवारा संघामध्ये स्वीकारण्यात येतील.
इतकेच नव्हे तर सुप्रीम कोर्टाने आठ दिवसापूर्वी दिलेल्या निर्णयानुसार ज्यांनी ई श्रम कार्ड काढलेले आहे पण त्यांच्याकडे जर रेशन कार्ड नसेल तर त्यांना रेशन कार्ड मिळवून देण्याचे संघटनेने ठरवलेले आहे. तरी याबाबत या सर्व योजनांचा अर्ज करून लाभ घ्यावा असे आव्हान मेळाव्यामध्ये करण्यात आले. या मेळाव्याच्या अध्यक्षा कॉ सुमन पुजारी या होत्या.
सदर मेळावा यशस्वी होण्यासाठी संघटनेच्या जनरल सेक्रेटरी प्रा शरयू बडवे, कॉ सलीम इनामदार, कॉ संतोष बेलदार, कॉ अर्चना बेळंकी, कॉ रोहिणी कांबळे, कॉ मनीषा पवार, कॉ सीमा वाघमोडे, कॉ बाळासाहेब वसगडेकर, कॉ सतीश सूर्यवंशी, कॉ शाबिरा शेरेकर, कॉ अर्चना बेलंकी, कॉ विनोद पाणबुडे, कॉ वैभव बडवे, कॉ सनम मुल्ला, कॉ रोहिणी खोत, कॉ स्वालिनी सौदागर, कॉ आदिती कुलकर्णी, कॉ अश्विनी केंगर शेखर पडळकर कॉ मोहन जाविर कॉ सुरेश जविर कॉ करण काळे, कॉ जहीर मोमीन, कॉ हरी पाटील, इत्यादींनी मेळावा यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.
Posted inसांगली
एक मे कामगार दिनानिमित्त सांगलीत बांधकाम कामगारांचा भव्य मेळावा संपन्न!
