जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून एस.व्ही.पाटील यांचा सन्मान.
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य संपर्कप्रमुख व दि प्राथमिक शिक्षक बँक कोल्हापूरचे संचालक एस.व्ही.पाटील यांनी स्वखर्चाने जिल्हयातील, महानगरपालिका, शासकीय व खाजगी शाळांतील ६००० मुलांची मोफत शिष्यवृत्ती सराव परीक्षा घेवून गुणवत्तावाढीसाठी विशेष कार्य केल्याबद्दल कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी -संजयसिंह चव्हाण यांनी आभारपत्र देवून सामाजिक व विधायक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
संजयसिंह चव्हाण शुभेच्छा देताना म्हणाले, शिष्यवृत्ती सराव परीक्षामुळे विद्यार्थांचा आत्मविश्वास वाढून भविष्यात स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्यासाठी प्रेरणादायी ठरेल.गुणवत्ता वाढीसाठी चांगला उपक्रम राबविलेबद्दल प्रशासनाच्या वतीने आभार मानले.
याप्रसंगी छत्रपती शिवाजी प्राथमिक पतसंस्था करवीर चे सचिव मनोज माळवदकर,संचालक राजाराम घुंगुरकर,संघ पदाधिकारी रविंद्र परीट उपस्थित होते.