तंत्रज्ञानाने मानवरहित बांधकाम सुपरव्हिजन शक्य : जे जे मगदूम अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचे संशोधन
जयसिंगपूर येथील डॉ.जे. जे मगदूम कॉलेज ऑफ इंजीनियरिंग मधील सिव्हिल व कॉम्प्युटर सायन्स इंजीनियरिंगच्या विद्यार्थ्यांनी तज्ञ
मार्गदर्शकांच्या सहाय्याने ” कन्स्ट्रक्शन साईट इन्स्पेक्शन बाय रोबोट ” असा संशोधन प्रोजेक्ट सादर केला आहे. बदलत्या काळातील नव्या तंत्रज्ञानाची दिशा ओळखून कन्स्ट्रक्शन साइट वरती दररोज होणाऱ्या बांधकामाचे निरीक्षण व वापरात असलेल्या मटेरिअलचे मोजमाप आणि बांधकामावरील मजुरांची संख्या ड्रोन च्या आधारे घेऊन इतंबूत माहिती संग्रहित करणाऱ्या आज्ञावलीचा शोध या विद्यार्थ्यांनी लावला आहे. आपण दिलेल्या सूचनेनुसार ड्रोन स्वतः साईटचे निरीक्षण करून आज्ञावली द्वारे माहिती संग्रहित करणार आहे व कामाच्या प्रगतीचा रिपोर्ट आपल्याला घरी किंवा ऑफिसमध्ये बसून मिळू शकतो असा या संशोधनाचा गाभा आहे. अशी माहिती प्रोजेक्ट मार्गदर्शक डॉ. डी. बी.देसाई व डॉ. डी. ए. निकम यांनी दिली.
आदित्य देसाई, स्नेहल पाटील, स्नेहा
छाचवाले, विवेक आडमुठे, ऋषिकेश पाटील, निश्चय भोकरे या विद्यार्थ्यांनी प्रस्तुत तंत्रज्ञानाचा शोध प्रोजेक्ट केला आहे. या प्रोजेक्टला देशपातळीवरील दोन, राज्य व विद्यापीठ पातळीवरील सहा अशी एकूण आठ पारितोषिके मिळाली आहेत. सदरचा प्रोजेक्ट त्रिमूर्ती असोसिएट्स बांबवडे जिल्हा सांगली यांनी स्पॉन्सर केलेला असून पेटंट मान्यतेसाठी महाविद्यालयाकडून पुढे दिलेला आहे. संशोधन केलेल्या विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शकांचे डॉ. जे. जे. मगदूम ट्रस्टचे चेअरमन डॉ. विजय मगदूम व्हाईस चेअरपर्सन डॉ. सोनाली मगदूम कॅम्पस डायरेक्टर डॉ. सुनील आडमुठे प्राचार्या डॉ. शुभांगी पाटील यांनी अभिनंदन केले व विद्यार्थ्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
तंत्रज्ञानाने मानवरहित बांधकाम सुपरव्हिजन शक्य : जे जे मगदूम अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचे संशोधन
