डॉ.जे. जे. मगदूम इंजीनियरिंग मध्ये प्रवेश म्हणजे प्लेसमेंट निश्चित : ३२ वर्षाची शैक्षणिक परंपरा अबाधित.
जयसिंगपूर येथील डॉ.जे. जे. मगदूम ट्रस्ट अंतर्गत कार्यरत असलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयाने आज अखेर १६०० हून अधिक विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी देऊन व्यावसायिक शैक्षणिक परंपरेस साजेसे काम केले आहे अशी माहिती कॅम्पस डायरेक्टर डॉ. सुनील आडमुठे व प्राचार्या डॉ.शुभांगी पाटील यांनी दिली.
पंचक्रोशीतील शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाची असलेली गरज ओळखून १९९२ ला डॉ.जे.जे.मगदूम व त्यांच्या सुविद्य पत्नी डॉ. प्रभावती मगदूम यांनी इंजिनिअरिंग कॉलेज सुरू केले.
शहरी भागातील विद्यार्थ्यांच्या बरोबरच खेड्यातील शेतकऱ्याचा मुलगा परदेशापर्यंत जाऊ धडकला पाहिजे उद्योग व्यवसायात अग्रेसर राहिला पाहिजे ही आमच्या आई-वडिलांची मनोकामना होती त्यास अनुसरून आम्ही कार्य करत आहोत असे मत ट्रस्टचे चेअरमन डॉ.विजय मगदूम व व्हा.
चेअरपर्सन ॲड. डॉ. सोनाली मगदूम यांनी व्यक्त केले.
सन १९९२ पासून शासकीय, निमशासकीय व खाजगी क्षेत्रात नोकरी करत असलेले अनेक विद्यार्थी आहेत. अजिंक्य पाटील, राकेश जाधव, बुरले यांच्यासारखे नामांकित बांधकाम व्यवसायिक म्हणून नावारूपास आलेले आहेत. बऱ्याच विद्यार्थ्याची शासकीय सेवेत वर्णी लागली आहे, तर शैक्षणिक क्षेत्रात विद्यादानाचे काम करणारे प्राध्यापक या क्षेत्रातील आहेतच. अक्षय रुणवाल, भाऊसाहेब शेडबाळे, सौरभ पोद्दार,रोहित पोद्दार, बिपिन जगदाळे यांच्यासारखे अनेक विद्यार्थी परदेशात मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीत काम करतात. अनेक अवॉर्ड मिळवणारे रवींद्र वेल्हाल हेही जे. जे. मगदुम इंजिनिअरिंगचेच. संदीप शिंदे, प्रताप कोळी, सौरभ जाधव, एन.डी. पाटील व अजून काही विद्यार्थी पोलीस खाते, इरिगेशन विभाग व नगरपालिका या क्षेत्रात सुयोग्य काम करत आहेत.काही निवडक माजी विद्यार्थ्यांचा संपर्क करता हॆ अतुलनीय यश समोर आले.
आय. ए. एस. निहाल कोरे, परदेशात स्कॉलरशिप मिळवणारे निखिल बनगे या विद्यार्थ्यांशी संपर्क साधला असता विद्यार्थ्यांशी महाविद्यालय व्यवस्थापनाचा असलेला जवळीकतेचा संबंध, उत्कृष्ट अनुभवी प्राध्यापक वर्ग, सर्व संपन्न ग्रंथालय, पूर्णवेळ अभ्यासिका आणि महाविद्यालयांनी वेळोवेळी पुरविलेल्या सेवा-सुविधा यामुळेच आम्ही हे यश संपादन करू शकलो असे गौरवोद्गार त्यांनी महाविद्यालया संदर्भात काढले.
इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षापासून विद्यार्थ्यांना ट्रेनिंग देणे, ॲडव्हान्स कॉम्प्युटर लॅब, सुसज्ज ग्रंथालय, अद्यावत इंटरनेट सेवा, संशोधनासाठी लागणारे संदर्भ साहित्य व लॅबोरेटरीज सोबत प्रदीर्घ शैक्षणिक अनुभव असलेले प्राध्यापक वर्ग, स्पोर्ट्स व जिम्नेशियम, सक्षम सांस्कृतिक विभाग या सोबतच बस सेवा कौशल्य विकास व औद्योगिक विकासासाठी उपलब्ध असणाऱ्या विविध योजनांचा विद्यार्थ्यांना माहिती देणे हे व्रत जोपासल्यानेच डॉ. जे जे मगदुम इंजिनिअरिंग हे विद्यार्थ्यांच्या पसंतीस उतरले आहे.
जागतिक बाजारपेठेत शिवाजी विद्यापीठाची संलग्न राहून ” युवर ड्रीम अवर मिशन ” या महाविद्यालयाच्या ब्रीद वाक्याचे तंतोतंत पालन करण्यासाठी सर्व प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी आपले मोलाचे सहकार्य करीत आहेत, त्यामुळेच इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी डॉ.जे. जे. मगदूम इंजीनियरिंग कॉलेज विद्यार्थ्यांच्या साठी प्रथम पर्याय बनले आहे, अशी माहिती कॅम्पस डायरेक्टर व प्राचार्या यांनी दिली. विद्यार्थि व पालकांनी आमच्या महाविद्यालयावर दाखवलेला विश्वास फोल ठरू दिला जाणार नाही प्रवेश प्रक्रियेसाठी महाविद्यालयामध्ये मदत केंद्र सुरू केले असून अधिक माहितीसाठी या 942-067-5861नंबर वरती संपर्क करावा असे त्यांनी सांगितले.
डॉ.जे. जे. मगदूम इंजीनियरिंग मध्ये प्रवेश म्हणजे प्लेसमेंट निश्चित : ३२ वर्षाची शैक्षणिक परंपरा अबाधित.
