क
नऊ ऑगस्ट क्रांती दिना निमित्त सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर संयुक्त कामगार संघटनांच्या वतीने धडक मोर्चा!
देशातील केंद्रीय कामगार संघटनांच्या वतीने देशभर नऊ ऑगस्ट रोजी कामगारांच्या मागण्यासाठी लढाऊ आंदोलन करण्याचा निर्णय झालेला आहे. सध्या देशांमध्ये प्रचंड महागाई वाढलेली असून प्रचंड वाढत चाललेल्या बेकारीमुळे सर्वसामान्य जनतेचे जगणे मुश्कील झालेले आहे.
अशातच बीजेपी सरकारने चार लेबर कोर्ट सक्तीने लागू करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. त्यामुळे या देशातील कामगारांचे सर्व कायदेशीर हक्क संपुष्टात येण्याचा धोका निर्माण झालेला आहे. त्याचबरोबर सध्या बीजेपी सरकार सातत्याने खाजगीकरण करीत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात कामगार कपात केली जात आहे.
म्हणूनच चार लेबर कोड प्रकिया ताबडतोब रद्द करा, एक जरी कामगार असला तरी या देशातील असंघटित उद्योगातील कामगारांना दरमहा २६ हजार रुपये किमान वेतन मिळाली पाहिजे या मागणीसाठी 9 ऑगस्ट रोजी क्रांतीसिंह नाना पाटील पुतळा विश्रामबाग येथून कलेक्टर कचेरीवर मोर्चा सुरुवात होईल. तरी या महत्त्वपूर्ण मोर्चामध्ये सांगली जिल्ह्यातील कष्टकरी कामगार कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे.
यासंदर्भातली तयारीचे बैठक सांगली निवारा भवन आयटक कार्यालय येथे रविवारी होऊन या बैठकीस सर्व श्रमिक संघटनेचे नेते व बँकिंग कामगारांचे नेते श्री अतुल दिघे यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीस कॉ शंकर पुजारी, साथी पी एन काळे, कॉ गोपाळ पाटील, कॉ महादेव कांबळे, कॉ सुमन पुजारी, साथी प्रशांत पाटील, कॉ दत्तात्रय परीट, कॉ सुमन पुजारी व कॉ प्रदीप कांबळे इत्यादी उपस्थित होते.
9 ऑगस्ट धडक मोर्चाच्या तयारीसाठी तीन ऑगस्ट रोजी ठीक सायंकाळी पाच वाजता सांगली निवारा भवन येथे आयटक कार्यालय( डी मार्ट सांगली जवळ )महत्त्वाची कामगार संघटना कार्यकर्ते व नेत्यांची बैठक आयोजित केलेली आहे. तरी या बैठकीस सर्व कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनी उपस्थित रहावे असे आवाहन करणारे पत्रक कॉ शंकर पुजारी, साथी पी एन काळे व कॉ गोपाळ पाटील यांनी प्रसिद्धस दिलेले आहे.