दलित बहुजन उपेक्षित समाजाच्या परिवर्तनासाठी प्रस्थापित समाज व्यवस्था मोडीत काढली पाहिजे.पंडितभाऊ दाभाडे
पुणे दि. समाजा समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करून ब्राह्मणवादी आणि जातीयवादी आज केंद्रात व राज्यात कार्यकर्ते बनले आहेत दलित बहुजन वंचित आणि उपेक्षित समाजाला सामाजिक न्याय मिळवण्यासाठी प्रस्थापित व्यवस्था मोडून काढली पाहिजे असुन दलित बहुजन वंचित अपेक्षित यासह अनेक घटकांच्या समाजाच्या न्याय परिवर्तनासाठी रस्त्यावरच्या लढाईची वेळ आली आहे असे प्रतिपादन बहुजन जनता दल संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांनी केले
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 103 व्या जयंती दिनानिमित्त पुणे जिल्हा बहुजन जनता दल शाखेच्या वतीने मंगळवार दिनांक 1 ऑगस्ट 2023 रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यासाठी सारसबाग येथील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ पुणे जिल्हा बहुजन जनता दलाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडितभाऊ दाभाडे बोलत होते
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती दिनानिमित्त बहुजन
जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या पुतण्याला पुष्पहार घालून अभिवादन केले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुणे जिल्हा बहुजन जनता दलाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन पुणे शहर बहुजन जनता त्याला अध्यक्ष सुभाष सुरवाडे यांनी केले यावेळी राज माने भगवान करे राजेंद्र गायकवाड दिपक पाटील किशोर कदम प्रवेश उके सुरेश जिंदे सुनील वासनिक अक्षय तायडे संजय क्षीरसागर केशव पाटील यांच्यासह बहुजन जनता दलाचे अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते