तुम मुझे यु भुला ना पाओगे’ बहारदार मैफिल संपन्न

तुम मुझे यु भुला ना पाओगे’ बहारदार मैफिल संपन्न

‘तुम मुझे यु भुला ना पाओगे’ बहारदार मैफिल संपन्न

इचलकरंजी ता.२ हिंदी चित्रपट सृष्टीवर आपल्या गायकीने अनेक दशके अधिराज्य गाजविलेले महंमद रफी यांच्या ४३ व्या स्मृति दिनाच्या निमित्ताने प्रबोधन वाचनालय, रंगयात्रा नाट्य संस्था आणि योगेश्वरी प्रतिष्ठान यांच्या सहयोगाने स्थानिक कलाकारांचा गाण्याचा कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला.
प्रारंभी अरुण दळवी यांनी ” मन तडपत हरी दर्शन को आज” या रफी साहेबांच्या गीतांची आठवण करून दिली. या गीताचे गायक मोहम्मद रफी, गीतकार शकील बदायुनी आणि संगीतकार नौशाद असून काशी हे गीत हिंदूंचे प्रार्थना गीत म्हणून मानले जाते. याचाच अर्थ कलेच्या क्षेत्रात जात-पात धर्म हे सर्व भेद अर्थहीन असतात. मोहम्मद रफी यांचे गाणे त्या अर्थाने सर्व भेदान पलीकडे अस्सल भारतीय बनले आहे हे स्पष्ट केले.प्रसाद कुलकर्णी यांनी उपस्थित रसिकांचं स्वागत व प्रास्ताविक केले. तसेच मोहम्मद रफी कलाकार व माणूस म्हणून अव्वल असल्याचे काही किस्से ही सांगितले. यावेळी कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य करणारे अहमद मुजावर, ९१ वर्षीय रसिक रघुनाथराव दळवी,अजित मिणेकर ,संजय काशीद,
मराठी मालिकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या तुषार कुडाळकरचा या इचलकरंजीकर अभिनेत्याचा व इतरांचा प्रा. मिलींद दांडेकर यांचे हस्ते करण्यात आला.

‘सुख के सब साथी ‘या मिलींद दांडेकर आणि मनिष आपटे यांच्या गीतांनी मैफिलीस सुरुवात झाली. नंतर कार्यक्रम बहरतच गेला. इक हंसी शाम मे, चांद मेरि दिल..ही गीते योगेश नवनाळे यांनी गायली.,चौदहवी का चांद आणि बदनपे सितारे लपेटे हुए या मनिष आपटेनी गायलेल्या गीताबरोबरच कार्यक्रमाचा नूरच पालटला.गिरीश कुलकर्णी यांच्या आवाजात हुई शाम उनका खयाल, हुस्नवाले तेरा जवाब नहीं व कही ना काही तो या गीतांनी रसिक चिंब झाले.मैफिलीत जान आणली ती प्राची करोनी हिने गायलेल्या उनसे मिली नजर आणि हसता हुआ नूरानी चेहरा या गाण्यामुळे.

छलकाये जाम व मैं कही कवि ना बन जाऊ या नशील्या गाण्यांना स्वर दिला मिलींद दांडेकर यांनी.फिरोज खैरदी याने एहसान तेरा होगा मुझपर या गीताने तर वेगळीच उंची गाठली.आसू भरी है ये जीवन की राहे या अरुण दळवी यांच्या गीताने सारेच अंतर्मुख झाले.निवास साळुंखे यांच्या पुकारता चला हू मैं..या गाण्याने सगळ्यांना ठेका धरायला लावला.दर्दे दिल दर्दे जिगर आणि करता हुआ तेरा वादा या अजित भिडेच्या गीतांनी रसिकांसमोर सवालच उभा केला.प्रताप जाधव यांच्या जब मोहब्बत जवान होती है या गाण्याने सारेच अचंबित झाले. आजा तुझको पुकारे मेरे गीत या संभाजी सोनकांबळे या कामगारांने गायलेल्या गीताने सगळेच दिगमूढ झाले. माऊथ ऑर्गनच्या सूरानी एक लहर आली आणि जाता जाता बाबुल की दुवाए लेती जा या गाण्यामुळे सर्वांचे डोळे पाणावून गेली.ही किमया केली अनंता झाड यांनी. या कार्यक्रमाचे ध्वनिसयोजक प्रशात होगाडे यांनी तेरी गलीयोमे ना रखेगे कदम हे गीत गाऊन आश्चर्याचा सुखद धक्का दिला.भाऊसाहेब केटकाळे यांच्या नफरत की दुनिया छोड के या गीताने एक वेगळाच माहोल तयार झाला. रसिकाग्रणी अहमद मुजावर यांच्या तेरे नाम का दिवाना या गाण्याने आनंदी मूड झाला.. सरतेशेवटी हा तुम मुझे यू भुला ना पाओगे या मिलींद दांडेकर मनिष आपटे आणि गिरीश कुलकर्णी या गीताने झाली.रफी साहेबांच्या आठवणी किस्स्यासहीत बहारदार सूत्र संचालन संजय सातपुते आणि संपदा ओगले यांनी केले.या कार्यक्रमासाठी प्रसाद कुलकर्णी, अरुण दळवी ,प्रा. मिलींद दांडेकर यांनी विशेष परिश्रम घेतले. समाजवादी प्रबोधिनी झालेल्या या कार्यक्रमासाठी रसिक प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद व दाद मिळाली.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *