सुळकूड पाणी योजनेसाठी इचलकरंजी शहरातील सर्व पक्ष व संघटना सर्वसमावेशक कृति समिती स्थापन.
सोमवार दि. २१ ऑगस्ट रोजी प्रांत कार्यालयावर विराट मोर्चा.
र द
इ
क
इचलकरंजी दि. ५ – “इचलकरंजी शहरासाठी सुळकूड पाणी योजनेची अंमलबजावणी व कार्यवाही त्वरीत सुरु झालीच पाहिजे. या मागणीसाठी सोमवार दि. २१ ऑगस्ट रोजी प्रांत कार्यालयावर विराट मोर्चा आयोजित करण्यात येईल. या मोर्चाची पूर्वतयारी म्हणून ९ ऑगस्ट ते १८ ऑगस्ट या १० दिवसांत विभागवार जनजागरण मेळावे आयोजित करण्यात येतील. या मोर्चामध्ये व विभागीय मेळाव्यामध्ये शहरातील सर्व नागरिक बंधु भगिनींनी हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे” असे आवाहन इचलकरंजी सुळकूड पाणी योजना कृति समितीच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच या प्रश्नी जनजागरण मोहीमेची सुरुवात दि. ९ ऑगस्ट क्रांतीदिनी सकाळी १० ते ११ पाटील मळा ते सांगली नाका मानवी साखळी कार्यक्रमाने करण्यात येईल असाही निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे.
सुळकूड पाणी योजनेची अंमलबजावणी झालीच पाहिजे या प्रमुख मागणीसाठी इचलकरंजी शहरातील सर्व राजकीय पक्ष, कामगार संघटना, विविध समाज सेवी व सामाजिक संघटना, महिला संघटना यांची व्यापक बैठक आज सायंकाळी समाजवादी प्रबोधिनी, इचलकरंजी येथे संपन्न झाली. या बैठकीमध्ये शहरातील सर्व पक्ष, कामगार संघटना, समाजसेवी संघटना, महिला संघटना व अन्य विविध संघटना याप्रमाणे सर्वसमावेशक व्यापक “इचलकरंजी सुळकूड पाणी योजना कृति समिती स्थापन करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे व वरीलप्रमाणे क. सदा मलाबादे यांच्या निमंत्रणानुसार आयोजित केलेली ही बैठक प्रताप होगाडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीमध्ये विविध पक्ष व संघटना प्रतिनिधींची समन्वय समिती स्थापन करण्याचाही निर्णय घेण्यात आला. या बैठकीमध्ये शशांक बावचकर, राहुल खंजीरे, मदन कारंडे, नितीन जांभळे, प्रसाद कुलकर्णी, कॉ. सुनील बारवाडे, ॲड. अनिल डाळया, अहमद मुजावर, राजाराम धारवट, भाऊसाहेब आवळे, महादेव गौड, अजीतमामा जाधव, अभिजित पटवा, विकास चौगुले, प्रा. अशोक कांबळे, बजरंग लोणारी, सयाजी चव्हाण, प्रा. ए बी पाटील, प्रताप पाटील, राजू बोंद्रे, राजू आलासे, दिपक सुर्वे, रवि जावळे, पै. अमृत भोसले, बाळासाहेब कलागते, सौ. सुषमा साळुंखे, सौ. रिटा रॉड्रिग्युस, कॉ. भरमा कांबळे, कॉ. हणमंत लोहार, विक्रांत ढवळे, अजीत मिणेकर, प्रदिप कांबळे, डि. एस. डोणे, संजय पोळ, अब्राहम आवळे, इरान्ना सिंहासने व अन्य अनेक मान्यवर उपस्थित होते.
–
इ