नऊ ऑगस्ट रोजी क्रांती दिनानिमित्त कर्मचारी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा
मोर्चा तयारीसाठी रविवार दिनांक 6 ऑगस्ट रोजी कामगार कर्मचारी संघटनांच्या प्रमुख प्रतिनिधींची बैठक झाली यानंतर पत्रकार बैठक घेऊन नऊ ऑगस्ट रोजी सांगली जिल्ह्यातील जास्तीत जास्त कर्मचारी कामगारांनी मोर्चात मध्ये सामील व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे.
तारीख नऊ ऑगस्ट रोजी ठीक सकाळी अकरा वाजता विश्रामबाग क्रांतीसिंह नाना पाटील पुतळ्यापासून मोर्चाची सुरुवात होईल.
या महत्त्वपूर्ण बैठकीसाठी सरकारी कर्मचारी कामगार संघटनांचे नेते श्री डी जी मुलानी ,श्री पी एन काळे, आयटक कामगार संघटनेचे कॉ शंकर पुजारी, श्रमिक संघटनेचे कॉ गोपाळ पाटील, कास्ट्रिब संघटनेचे कुमार कांबळे, हॉस्पिटल मधील कर्मचाऱ्यांचे नेते श्री विजय पाटील, सदाशिव शिंदे, महादेव देशिंगे इत्यादि बैठकीसाठी उपस्थित होते. त्यांच्या वतीने बुधवार दिनांक 6 ऑगस्ट रोजी पत्रकार बैठक घेण्यात आली.
Posted inसांगली
नऊ ऑगस्ट रोजी क्रांती दिनानिमित्त कर्मचारी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा
