माझी रत्नागिरी माझी जबाबदारी योजनेअंतर्गत केलेल्या सर्वेचा मोबदला किमान प्रत्येकी एक हजार रुपये १३५० आशा व bf महिलांना मिळणार याबाबत जिल्हाधिकारी श्री देवेंद्र सिंग यांचे आश्वासन!
माझी रत्नागिरी माझी जबाबदारी ही मोहीम कोविड काळामध्ये एक मे 2021 ते 15 मे 2021 पर्यंत राबविण्यात आली. या पंधरा दिवसांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व आशा व गटप्रवर्तक महिलां गटांनी 750 घरांना भेटी दिलेल्या आहेत. यासाठी आशा व गटप्रवर्तक महिलांना ठरवून दिलेला मोबदला दोन वर्षे झाली तरीही अद्याप मिळालेला नाही.
सदर मोहीम रत्नागिरी जिल्हा अधिकारी यांचे मार्फत सुरू करण्यात आलेली होती. त्यामुळे रत्नागिरी जिल्हा परिषद मध्ये चौकशी केली मोबदला रक्कम मागणी केली असता मागील दोन वर्षापासून त्यांच्याकडून असे सांगण्यात येत होते की या कामाचा मोबदला जिल्हाधिकारी यांचे मार्फत देणे आवश्यक आहे.
म्हणूनच 31 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र आशा गटप्रवर्तक व आरोग्य कर्मचारी संघटनेच्या शिष्टमंडळाच्या वतीने रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री देवेंद्र सिंह यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनाबाबत बोलताना मोबदला का दिलेलं नाही याची माहिती घेण्यासाठी त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांना फोन केला. आणि जिल्हाधिकारी यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांना सांगितले की, आशा व गटप्रवर्तक महिलांची या योजनेची सर्व थकीत रक्कम ताबडतोब देणे आवश्यक आहे. तर त्याची तजवीज करावी असा आदेश त्यांनी दिला.
सध्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 1350 इतक्या
आशा व गटप्रवर्तक महिला आहेत त्यांना सरासरी माझी जबाबदारी माझी रत्नागिरी योजनेअंतर्गत काम केल्याबद्दल प्रत्येकी एक हजार रुपये मिळण्याची शक्यता आहे.
याबद्दल शिष्टमंडळाच्या वतीने रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री देवेंद्र सिंग यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले. सुमन पुजारी, वेदिका गडदे, जयश्री साठे कॉ शंकर पुजारी व कॉ विशाल बडवे इत्यादींचा शिष्टमंडळामध्ये समावेश होता.
Posted inसांगली
माझी रत्नागिरी माझी जबाबदारी योजनेअंतर्गत केलेल्या सर्वेचा मोबदला किमान प्रत्येकी एक हजार रुपये १३५० आशा व bf महिलांना मिळणार याबाबत जिल्हाधिकारी श्री देवेंद्र सिंग यांचे आश्वासन!
