श
नजमा शेख यांची विशेष
कार्यकारी अधिकारीपदी निवड
फ
इचलकरंजी/प्रतिनिधी –
सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील पात्र उमेदवारांची विशेष कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती केल्याची यादी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जाहीर केली. त्यामध्ये कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेतील महिला बचत गटाच्या प्रवर्तक तथा महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त कु. नजमा गुलाब शेख यांचा समावेश आहे.
येथील कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या माध्यमातून शहर व परिसरात महिला बचत गटाचे जाळे विणणार्या नजमा शेख यांची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून निवड झालेबद्दल सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे. सहकार महर्षि कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार प्रकाश आवाडे, बँकेचे चेअरमन स्वप्निल आवाडे आणि माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली बचत गटातील महिलांचे सक्षमीकरणात त्या अग्रेसर आहेत. बँकेच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी व उद्योजक बनविण्यात त्या सातत्याने धडपडत असतात. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांची विशेष कार्यकारी अधिकारीपदी निवड करण्यात आली आहे. याकामी आमदार प्रकाश आवाडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या निवडीबद्दल आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते नजमा शेख यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बाळासाहेब माने, राहुल घाट, शितल पाटील, जमीर शेख आदी उपस्थित होते.