डॉ. जे. जे. मगदूम अभियांत्रिकी मध्ये माजी विद्यार्थी मेळावा सप्पन्न

डॉ. जे. जे. मगदूम अभियांत्रिकी मध्ये माजी विद्यार्थी मेळावा सप्पन्न

डॉ. जे. जे. मगदूम अभियांत्रिकी मध्ये माजी विद्यार्थी मेळावा सप्पन्न
जयसिंगपूर : येथील डॉ. जे.जे.मगदूम कॉलेज ऑफ इंजीनियरिंगमध्ये माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन २६ जानेवारी २०२४ रोजी करण्यात आले. महाविद्यालयाचे बरेच माजी विद्यार्थी परदेशात उच्च पदस्थ काम करत आहेत, काही शासकीय सेवेत रुजू आहेत व बरेच विद्यार्थ्यांनी नामांकित उद्योजक म्हणून नावलौकिक मिळवला आहे. या सर्वांची भेट व्हावी व महाविद्यालयाच्या प्रगतीचा चढता आलेख माजी विद्यार्थ्यांसमोर मांडून त्यांना त्यामध्ये सहभागी करुन घेणे हा मेळाव्याचा हेतू होता .
डॉ.जे.जे.मगदूम ट्रस्टचे चेअरमन डॉ. विजय मगदूम व व्हाईस चेअरपर्सन ॲड. डॉ. सोनाली मगदूम यांच्या हस्ते मेळाव्याचे औपचारिक उद्घाटन झाले. उपस्थित पाहुणे व विद्यार्थ्यांचे स्वागत ॲडव्हायझर डॉ. उमेश देशन्नावर यांनी केले. प्र. प्राचार्या डॉ. शुभांगी पाटील यांनी महाविद्यालयात उपलब्ध सोयी-सुविधा तसेच विविध उपक्रमांची माहिती सादर केली. कॅम्पस डायरेक्टर डॉ. सुनील आडमुठे यांनी मेळाव्याचा हेतू विषद केला.
उपस्थितांमध्ये बरेच विद्यार्थी सनदी अधिकारी व इतर प्रशासकीय सेवेत काम करत आहेत तसेच विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये उच्च पदांवर कार्यरत आहेत याचा अभिमान व्यक्त करताना महाविद्यालयाने प्राप्त केलेल्या आय. एस. ओ, मानांकन, न्नॅक ए ग्रेड तसेच स्वायत्त दर्जा याची माहिती डॉ. विजय मगदूम यांनी अध्यक्षीय भाषणातून दिली. ट्रस्टचे संस्थापक चेअरमन स्व. डॉ. जे. जे. मगदुम व स्व. डॉ. प्रभावती मॅडम यांचे स्वप्न साकार करण्याची जबाबदारी आमच्यावर आहे व आम्ही ती कसोशीने पार पाडू असे व्हा. चेअरपर्सन ॲड.डॉ.सोनाली मगदूम यांनी सांगितले.
माजी विद्यार्थ्यांमधील प्रा. प्रशांत पाटील यांनी व्यक्तिगत पातळीवरती चेअरमन साहेबांनी केलेल्या आर्थिक मदतीचा पुनरुच्चार करून कृतज्ञता व्यक्त केली. सनदी अधिकारी किशोर नलावडे यांनी ग्रंथालयातील संदर्भ पुस्तकांचा उपयोग माझ्या अभ्यासासाठी झाला. संयम ढळू न देता कष्टातील सातत्य निश्चित यश देते असे सांगून भविष्यात आमची गरज महाविद्यालयाला कोणत्याही प्रकारे लागली तर आम्ही प्रकर्षाने हजर राहू असा विश्वास व्यक्त केला. सिमला येथील उद्योजक महमूद अली शेख यांनी संस्थापक चेअरमन डॉ. मगदूम यांच्या प्रति सद्भावना व्यक्त करून डॉ. विजय मगदूम साहेबांच्या बद्दल आदर व्यक्त केला.
रजिस्टार प्रा. एस. टी. जाधव,डीन-स्टुडंट्स प्रा. पी.पी.पाटील, डी आर माने यांच्या मार्गदर्शनाखाली माजी विद्यार्थी विभागाच्या समन्वयक प्रा. सुप्रिया कारदगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मेळाव्यासाठी परिश्रम घेतले. सर्व डीन्स, विभागप्रमुख, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी स्वयंसेवक यांचे सहकार्य लाभले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *