कोल्हापूर जिल्ह्याने दिलेली साथ कदापि विसरणार नाही
मनोज जरांगे-पाटील यांनी सुरेशदादा पाटील यांच्यासमोर व्यक्त केली भावना
इचलकरंजी –
मराठा आरक्षणासाठीच्या लढ्यात कोल्हापूर जिल्ह्याने दिलेली साथ आपण कधीही विसरणार नाही, अशा भावना मनोज जरांगे-पाटील यांनी महाराष्ट्र क्रांती सेना पक्षाचे संस्थापक सुरेशदादा पाटील यांच्याशी बोलताना व्यक्त केल्या. वाशी येथील आंदोलनस्थळी सुरेशदादा पाटील यांनी जरांगे-पाटील यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी या भावना व्यक्त केल्या.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी अनेक महिन्यांपासून लढा सुरु केला होता. या मराठा आरक्षणाच्या लढ्यात महाराष्ट्र क्रांती सेना पक्षाचे संस्थापक सुरेशदादा पाटील यांनी आंतरवली सराटी येथे जावून जरांगे-पाटील यांची भेट घेऊन पाठींबा दिला होता. त्यावेळी पश्चिम महाराष्ट्र व कोकण विभागाची जबाबदारी सुरेशदादा यांच्यावर सोपविण्यात आली होती.
आरक्षणासाठी जरांगे-पाटील यांनी थेट मुंबईत आंदोलनाचा इशारा देत मुंबई गाठली. त्यावेळी वाशी येथे जमलेल्या आणि विविध भागातील मराठा आंदोलकांच्या भोजनाची व्यवस्था सुरेशदादा पाटील यांनी केली होती. आंदोलनासाठी येणार्या आंदोलनकर्त्यांची विचारपूस करत प्रत्येकाला भोजन, पिण्याचे पाणी देण्याबरोबरच आंदोलनठिकाणी जाण्यासाठी मार्गाची माहितीही देण्याचे काम केले. या लढ्याला यश मिळून शासनाने सर्वच मागण्या मान्य केल्या आहेत.
वाशी येथे आंदोलनस्थळी जावून सुरेशदादा पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी सुरेशदादा यांनी, प्रदीर्घकाळापासून आरक्षणासाठीचा संघर्ष सुरु होता. आता समाजाला न्याय मिळाला असून सकल मराठा समाजाने दाखविलेल्या एकजुटीने व मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे मराठ्यांच्या अंगावर गुलाल पडला असल्याचे सांगितले. तर जरांगे पाटील यांनी या संपूर्ण लढ्यात कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेने दिलेली साथ मोलाची ठरली असून ही साथ आपण कदापिही विसरणार नाही अशी भावना व्यक्त केली.
Posted inकोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्याने दिलेली साथ कदापि विसरणार नाहीमनोज जरांगे-पाटील यांनी सुरेशदादा पाटील यांच्यासमोर व्यक्त केली भावना
