बालगृहातील प्रवेशितांचा आजपासून जिल्हास्तरीय चाचा नेहरू बालमहोत्सव

बालगृहातील प्रवेशितांचा आजपासून जिल्हास्तरीय चाचा नेहरू बालमहोत्सव

बालगृहातील प्रवेशितांचा आजपासून जिल्हास्तरीय चाचा नेहरू बालमहोत्सव

सातारा दि.29 (ज महिला व बाल विकास विभागामार्फत राज्यात बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ अन्वये बालगृहे कार्यरत असून या बालगृहात अनाथ, निराधार, उन्मार्गी, विधी संघर्षग्ररूस्त मुले/मुली दाखल आहेत. दाखल प्रवेशितांच्या अंगी असलेल्या विविध कलागुणांना वाव मिळण्याच्या दृष्टीने सातारा जिल्ह्यातील बालगृहात दाखल असलेल्या व इतर विद्यालयातील एकुण २०० प्रवेशितांच्या जिल्हास्तरावरील चाचा नेहरू बालमहोत्सवा अंतर्गतच्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले आहे. हा बालमहोत्सव दि.30 जानेवारी ते 1 फेबुवारी या कालावधीत पोलीस कवायत मैदान,सातारा येथे संपन्न होणार असून जिल्हास्तरावरील चाचा नेहरू बालमहोत्सवाचे उद्घाटन राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री सातारा
शंभूराज देसाई यांच्याहस्ते दि. 30 जानेवारी रोजी सकाळी १०.०० वाजता करण्यात येणार आहे.

या क्रीडा स्पर्धांमध्ये खो-खो, कबड्डी, क्रिकेट, १०० मिटर धावणे, २०० मिटर धावणे, ४०० मिटर धावणे, रिले, गोळाफेक, थाळी फेक, लिंबू चमचा, संगित खुर्ची, उंच उडी, लांब उडी, इत्यादी क्रिडा स्पर्धा आयोजित केल्या आहेत. बौध्दिक स्पर्धांमध्ये बुध्दीबळ, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये वैयक्तिक नृत्य, समूह नृत्य, समूह गीते या स्पर्धा होणार आहेत. चाचा नेहरू बाल महोत्सवामध्ये विजेता ठरलेल्या विजयी व उपविजयी संघाना शिल्ड, ट्रॉफी, स्पर्धकांना प्रमाणपत्र व मेडल देवून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी बालकांना प्रशस्तिपत्र देवून गौरविण्यात येणार आहे.

या कार्यक्रमास शंभूराज शिवाजीराव देसाई, मंत्री, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री,ठाणे व सातारा जिल्हा तसेच मा.जिल्हाधिकारी, सातारा पोलीस अधिक्षक, सातारा, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सातारा व इतर मान्यवर उपस्थित राहून मुलां-मुलींना योग्य मार्गदर्शन करणार आहेत. दि. 1 फेबुवारी रोजी बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाने या बालमहोत्सवाचा समारोप होणार आहे. अशी माहिती कार्यक्रमाचे आयोजक जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विजय तावरे यांनी दिली.
000000

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *