क

सुधिंद्र कुलकर्णी यांच्या विरुध्द रिपब्लिकन पक्ष आक्रमक
मुंबईत फोटो जाळुन तर पुण्यात सुधिंद्र कुलकर्णी यांच्या फोटोला जोडे मारुन केले निषेध आंदोलन
मुंबई दि. 30- भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबत अवमानजनक वक्तव्य करणाऱ्या सुधिंद्र कुलकर्णी यांच्या विरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले) मुंबई प्रदेशच्या वतीने आाक्रमक भुमिका घेत तिव्र निषेध आंदोलन केले आहे.मुंबईत आझाद मैदान येथे सुधिंद्र कुलकर्णी यांचा फोटो जाळून रिपब्लिकन पक्षाने त्यांचा तिव्र निषेध केला.रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर,रिपाइंचे मुंबई प्रदेश अध्यक्ष सिध्दार्थ कासारे,सरचिटणीस विवेक पवार यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन आझाद मैदानात सुधिंद्र कुलकर्णी यांचा फोटो जाळून तिव्र निषेध आंदोलन केले.या आंदोलनात रिपाइं चे जिल्हा अध्यक्ष संजय पवार,रमेश गायकवाड,प्रकाश जाधव,संजय डोळसे,साधु कटके,सुनिल मोरे,नंदु साठे,सोना कांबळे,हरिहर यादव,अभया सोनावणे आदि नी या आंदोलनात भाग घेतला.
मुंबईत रिपब्लिकन पक्षाने सुधिंद्र कुलकर्णी यांचा फोटो जाळल्या नंतर पुण्यामध्ये रिपब्लिकन पक्षाने सुधिंद्र कुलकर्णी यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करुन तिव्र निषेध केला. यावेळी रिपाइं चे परशुराम वाडेकर,संजय सोनावणे,बाळासाहेब जाणराव,डॉ.धेंडे,एड.मंदार जोशी,शशिकलाताई वाघमारे,निलेश अल्हाड,यशवंत नडगम आदि अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार आहेत.हे सर्व जगाला मान्य आहे मात्र स्वयंघोषित विचारवंत सुधिंद्र कुलकर्णी यांनी संविधान निर्मितीचे श्रेय डॉ.बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा पंडित नेहरुंचे अधिक आहे असे चुकिचे वक्यव्य करुन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केला आहे. सुधिंद्र कुलकर्णी यांच्या या वक्तव्यामुळे देशवासियांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. सुधिंद्र कुलकर्णी हे मूर्खांच्या नंदनवनात वावरत असल्याचे सांगुन केद्रिय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी त्यांचा तिव्र निषेध केला आहे.
प
—