प्रलंबित तपासावरील प्रकरणांमधील चार्ज शीट लवकरात लवकर नोंदवा- जिल्हाधिकारी राहुल रेखावार

प्रलंबित तपासावरील प्रकरणांमधील चार्ज शीट लवकरात लवकर नोंदवा- जिल्हाधिकारी राहुल रेखावार

प्रलंबित तपासावरील प्रकरणांमधील चार्ज शीट लवकरात लवकर नोंदवा
– जिल्हाधिकारी राहुल रेखावार

ॲट्रॉसीटी बाबतच्या जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीच्या बैठकीत सूचना

कोल्हापुर, दि. 31 (ज : अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989 अंतर्गत जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीच्या बैठकित जिल्ह्यातील पोलीस तपासावरील विविध प्रलंबित प्रकरणांचा आढावा जिल्हाधिकारी तथा समिती अध्यक्ष राहुल रेखावार यांनी घेतला. यावेळी त्यांनी पोलीस तपासावरील प्रलंबित 23 प्रकरणांचा आढावा घेवून जलद तपास व कागदपत्रांची पूर्तता लवकरात लवकर करुन चार्ज शीट दाखल करण्याच्या सूचना दिल्या. या बैठकीत 7 प्रकरणांमधे अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले. तसेच इतर 24 कागदपत्रांअभावी प्रलंबित प्रकरणांचा आढावाही घेतला. यावेळी सहायक आयुक्त समाज कल्याण अधिकारी सचिन साळे यांनी माहिती सादर केली. बैठकीला पोलीस अधीक्षक यांचे प्रतिनीधी अपर पोलीस अधिक्षक जयश्री देसाई, सदस्य तथा जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, पोलीस निरीक्षक नाहसं पथक, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, अशासकीय सदस्य शहाजी गायकवाड, संतोष तोडकर, लता राजपूत, अविनाश बनगे, संजय कांबळे, निवृत्ती माळी उपस्थित होते.

        मागील सभेचा कार्यवृतांत वाचून सभेची सुरुवात झाली. यानंतर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989 अंतर्गत दाखल झालेल्या तथापी कागद पत्रांअभावी अर्थसहाय्य देण्यास प्रलंबित असणाऱ्या 24 प्रकरणांचा बाबनिहाय आढावा घेण्यात आला. तसेच यावेळी जिल्ह्यातील 7 प्रकरणांमध्ये सर्व पुर्तता झालेल्या प्रकरणांमध्ये अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले.

रमाई आवास घरकुल योजना शहरी मधील कामांचा आढावा

नवबौध्द घटक व मातंग घटक रमाई घरकुल आवास योजना शहरी मधील शिल्लक उद्दियष्टांबाबतचा आढावा जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष राहुल रेखावार यांनी घेतला. यावेळी सहायक आयुक्त नगरपालिका प्रशासन देवानंद ढेकळे, सहायक आयुक्त समाज कल्याण अधिकारी सचिन साळे यांचेसह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यात 355 उद्दिीष्ट असून यातील 56 मंजूर आहेत. झालेल्या बैठकीत नवीन 24 प्रकरणांना मंजूरी देण्यात आली. तसेच उर्वरीत लाभार्थ्यांचा शोध घेवून प्रकरणे एका आठवड्यात सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिले. यासाठी सर्वेक्षण करुन गरजू लाभार्थ्यांचा घेण्यासाठी शोध मोहिम गतीने राबवा. पुढील बैठक येत्या गुरुवारी होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

000000

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *