ॲड. डॉ.सौ.सोनाली विजय मगदूम यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न
जयसिंगपूर येथील डॉ. जे. जे. मगदूम ट्रस्टच्या व्हाईस चेअरपर्सन डॉ. सोनाली मगदूम यांचा वाढदिवस डॉ. जे. जे. मगदूम अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून विविध समाजभिमुख कार्यक्रमाचे आयोजन करून उत्साहात साजरा करण्यात आला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त ताराबाई अण्णासाहेब नरदे हायस्कूल नांदणी येथे महिला विषयी आरोग्य संदर्भात मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले होते. डॉ.सौ.संजीवनी हवालदार यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. वयोमानानुसार तारुण्यपणात शारीरिक व प्राकृतिक होणारे बदल आणि त्यास कसे सामोरे जावे याविषयी सविस्तर विवेचन करण्यात आले. तसेच व्यंकटराव यादव कर्णबधिर शाळा मार्केट यार्ड, जयसिंगपूर या ठिकाणी विद्यार्थ्यांना मा. प्राचार्या डॉ. एस. बी. पाटील व ॲडव्हायझर डॉ. यू. बी.देशांन्नावर, डॉ. डी. बी. देसाई, डी. आर माने.यांच्या हस्ते मिठाई वाटप करण्यात आले.
कर्णबधिर विद्यार्थ्यांच्या साठी केलेली प्रेम पूर्ण भेट विद्यार्थ्यांनी आदर युक्त स्वीकारली व विद्यार्थ्यांसहित शिक्षकांनी डॉ. सौ सोनाली मॅडम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमांचे नियोजन डॉ. जे.जे. मगदूम ट्रस्टचे चेअरमन डॉ. विजय मगदूम त्यांच्या प्रेरणेतून व कॅम्पस डायरेक्टर डॉ. सुनील आडमुठे यांच्या मार्गदर्शनाखाली विनायक चव्हाण, चेतन माने, किशोर गुळवे व खांडेकर यांनी पार पाडले.
कार्यक्रम स्थळी विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी डॉ. सोनाली मगदूम यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या व संस्थेचे आभार मानले.