*जे.जे. मगदूम अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची इस्त्रोस (ISRO) भेट *
जयसिंगपूर येथील डॉ.जे. जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजीनियरिंगच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि टेली कम्युनिकेशन विभागाच्या विद्यार्थ्यांनी हैद्राबाद येथील इस्त्रो (ISRO) शाखेला भेट देऊन अभ्यासदौरा पूर्ण केला. विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी महाविद्यालयाकडून डॉ. टी.एच. मोहिते पाटील यांनी अभ्यास दौऱ्याचे प्रमुख म्हणून काम पाहिले.
‘भारतीयांच्या जीवनातील खऱ्याखुऱ्या प्रश्नांबरोबरच तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास आपण प्रथम क्रमांकावरच असायला हवे’ असे मत डॉ. विक्रम साराभाई व डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचे होते. आजपर्यंत अंतराळ तंत्रज्ञानात आपल्या देशाची भूमिका स्वयंपूर्णतेची राहिली आहे. तथापि विद्यार्थ्यांमध्ये अंतराळ विषयक ज्ञानात भर पडावी, वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धिंगत व्हावा, संशोधन वृत्तीचा विकास व्हावा हा या शैक्षणिक दौऱ्याचा मुख्य हेतू होता असे प्रतिपादन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.एस. बी. पाटील यांनी केले. भेटीदरम्यान इस्त्रोचे डॉ. गणेश व त्यांच्या टीमनी विद्यार्थ्यांना बहुमोल सहकार्य मार्गदर्शन केले.
अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या मध्ये संशोधन वृत्ती जागावी यासाठी महाविद्यालयामध्ये स्वतंत्र रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेल कार्यरत आहे. नवीन एन. इ. पी. शैक्षणिक धोरणाचा अवलंब करत असताना शास्त्रीय दृष्टिकोन विद्यार्थ्यांच्या मध्ये दृढ व्हावा यासाठी आमचे महाविद्यालय विशेष काळजी घेत असते असे मत कॅम्पस डायरेक्टर डॉ. एस. एस.आडमुठे यांनी नमूद केले.
प्रतिवर्षी अशा शैक्षणिक दौऱ्याचे आयोजन डॉ.जे. जे.मगदूम ट्रस्टचे चेअरमन डॉ. विजय मगदूम, व्हाईस चेरपर्सन डॉ. सोनाली मगदूम यांच्या प्रोत्सानातून व ॲडव्हायझर डॉ.यु. एल.देशन्नवार यांच्या मार्गदर्शनाखाली
विभाग प्रमुख करत असतात. विद्यार्थ्यांचा हा अभ्यास दौरा पूर्ण करण्यासाठी विभाग प्रमुख प्रा. मंदार कोलप व विभागातील सर्व प्राध्यापकाचे सहकार्य लाभले.
Posted inकोल्हापूर
*जे.जे. मगदूम अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची इस्त्रोस (ISRO) भेट *
