महाराष्ट्रातील आशा व गटप्रवर्तक महिलांच्या मानधन वाढीचा जीआर काढण्यासाठी परत रविवार ता.11 फेब्रुवारी पासून मुंबई आझाद मैदान येथे हजारो महिलांचे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू!
मुंबई : महाराष्ट्रातील तीस हजार आशा व गटप्रवर्तक महिलांनी 9 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्त ठाणे येथे जाऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन शासनाने अद्याप तीन महिने झाले तरी आदेश काढलेले नाहीत ते जीआर त्वरित काढावेत अशी मागणी करण्यात आली. याबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असे मोघम उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहे हे आशा व गटप्रवर्तक महिलांना मान्य नसल्याने ठाण्यामध्ये ऐतिहासिक आंदोलन होऊन सुद्धा संप मागे घेण्यात आलेला नाही. संप एक महिन्यानंतर ही सुरू आहे.
महाराष्ट्रातील 72000 आशा व चार हजार गटप्रवर्तक महिलांनी 18 ऑक्टोबर 2023 पासून महाराष्ट्र मध्ये बेमुदत संप केलेला होता. या संपा बाबत एक नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री श्री तानाजी सावंत यांनी संघटना कृती समितीच्या बरोबर चर्चा करून पुढील प्रमाणे निर्णय घोषित केला आहे.
महाराष्ट्रातील सर्व आशा महिलांना दरमहा सात हजार रुपये मानधन वाढ, दोन हजार रुपये भाऊबीज आणि एपीएल बीपीएल भेदभाव न करता jsy योजनेचा लाभ देण्यात येईल.
गटप्रवर्तक महिलांच्या संदर्भात गटप्रवर्तकांना दरमहा दहा हजार रुपये मानधन वाढ, गटप्रवर्तक महिलाना दोन हजार रुपये भाऊबीज,गटप्रवर्तकांना सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांचे हक्क प्रदान करणे आणि आरोग्यवर्धिनीचे लाभ गटप्रवर्तकांना देणे असा निर्णय आठ नोव्हेंबर रोजी झाल्यानंतर संप मागे घेण्यात आलेला होता.
म्हणूनच मुंबई आझाद मैदान येते महाराष्ट्रातील आशा व गटप्रवर्तक महिलांचा निर्णय लढा बेमुदत हे आंदोलन सुरू आहे या आंदोलनामध्ये महाराष्ट्रातील सर्व अशा व गटप्रवर्तक महिलांनी सहभागी होणे आवश्यक आहे या आंदोलनासाठी प्रत्येक राज्य विभागामधून दिवस ठरवून आंदोलन करणे आवश्यक आहे
म्हणूनच पश्चिम महाराष्ट्रातील सर्व आशा व गटप्रवर्तक महिला यांनी मंगळवार दिनांक 13 फेब्रुवारी रोजी ठीक सकाळी दहा वाजता मुंबई आज मैदान येथे उपस्थित रहावे असे आवाहन करणारे पत्रक अखिल भारतीय आयटक आशा गटप्रवर्तक फेडरेशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष ज्येष्ठ कामगार नेते कॉ शंकर पुजारी आणि महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक आयटक फेडरेशनच्या राज्य जनरल सेक्रेटरी कॉ सुमन पुजारी यांनी प्रसिद्धस दिलेले आहे.