इचलकरंजी :
श्रमजीवी बुद्धिमत्ता गुण कौशल्य आत्मनिर्भर देशसेवा अशा विविध क्षेत्रांमध्ये अनेक गुणिजन आपली स्वतःची नोकरी उद्योग व्यवसाय संसार या गोष्टी बाजूला ठेवून अविरतपणे समाजासाठी झटत असतात तर काही मंडळी बुद्धी कौशल्य श्रम पैसा आणि कर्तुत्वाचा वापर करून समाजाचे व देशाचे हित साधणारे कार्य करीत असतात अशा गुणीजनांचे कौतुक करणे हा मानवी धर्म आहे, याचे पालन सहारा फाउंडेशन करून समाजामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय केलेल्या कामगिरीबद्दल पुरस्कार देऊन सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे कार्य करतात असे मत माजी आमदार ज्येष्ठ नेते सुरेशराव हळवणकर यांनी सहारा फाउंडेशनच्या चौदाव्या वर्धमान दिनानिमित्त राज्यस्तरीय 2024 च्या पुरस्कार वितरण प्रसंगी बोलताना व्यक्त केले,
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाराष्ट्र व गोवा राज्य बार कौन्सिल चे अध्यक्ष एडवोकेट विवेक घाटगे हे होते त्यांनी देखील गुणी गौरव जणांचे कौतुक तसेच श्रमजीवी कष्टकरी व होतकरूंना सहकार्य करून त्यांना उभारी देण्याचे अनमोल कार्य हे सहारा फाउंडेशनचे संस्थापक पापालाल सनदी व त्यांचे सहकारी करीत असतात त्यामुळेच आज महाराष्ट्र राज्यामध्ये सहारा फाउंडेशन चे कौतुक होत आहे असे मत मांडले ,,
कार्यक्रमास पैलवान अमृत भोसले ,हातकणंगले पंचायत समितीच्या सभापती रेश्मा सनदी ,कबनूर गावचे सरपंच शोभा पवार ,ग्रामपंचायत सदस्य वैशाली कदम ,युवा नेते गणेश पालकर प्रमोद पाटील ,जयेश बुगड ,अमर चव्हाण ,सिने अभिनेत्री शुभांगी गायकवाड, गृहरक्षक दलाचे प्रशासकीय अधिकारी श्री साळवे ,कोरोची चे सरपंच डॉक्टर संतोष भोरे,सहारा फाउंडेशनचे महाराष्ट्राचे अध्यक्ष परवेज सनदी दीपक नरंदेकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र राज्यातून आलेल्या पुरस्कार कर्त्यांना पुरस्कार देण्यात आले यामध्ये संतोष आठवले प्रसाद रानडे ,विनयकुमार पाटील, एडवोकेट इंद्रजीत कांबळे, मुंबईचे दिनकर आमकर, विश्वनाथ आंबपकर,प्रशासकीय अधिकारी दिलीप हजारे ,अनिल उपाध्ये ,हैदर अली मुजावर ,बाळासाहेब शिंदे ,निलोफर खतीब ,अभिजीत सुतार ,आसिफ शेख ,उमर गवंडी, सौ स्नेहलता शेटे,स्वर्गीय आप्पासाहेब उर्फ सारे पाटील महिला फाउंडेशन ,विवेकानंद बहुउदेशीय संस्था ,विद्याधर कांबळे, युसूफ तासगावे ,निलेश पाटील ,फारुख मुल्ला ,किस्मतवाशा पटेल ,सुनील हक्के,अशा विविध व्यक्ती ,संस्थांना शैक्षणिक, क्रीडा ,वैद्यकीय ,न्याय ,सामाजिक ,रोजगार ,सहकार ,प्रशासकीय अधिकारी तसेच आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून पुरस्कार देण्यात आले स्वागत महेश कांबळे प्रास्ताविक सहारा फाउंडेशनचे संस्थापक पापालाल सनदी व आभार उमेश जाधव यांनी मांनले सूत्रसंचालन सिने अभिनेते सचिन बेलेकर यांनी केले यावेळी सहारा फाउंडेशनचे सुरेश कुंभार ,मुनीर जमादार ,सचिन सुतार ,विजय देसाई, युसुफ मकानदार ,सचिन कांबळे ,जैद भोकरे ,महेश शिवडकर ,महेश पाटील आदींनी अतिशय उत्कृष्ट असे नियोजन केले होते,
Posted inकोल्हापूर
सहारा फाउंडेशन हे सामाजिक बांधिलकी की जोपासण्याचे कार्य करीत आहे -सुरेश हाळवणकर,
