म
संघर्षनायक मीडिया ऑनलाईन वृत्तसेवा :
माणगाव ता हातकणंगले येथील लंडन हाऊस होलोग्रफी शो जुना तक्का यांचे पंधरा दिवसाच्या आत लोकार्पण तसेच स्मारकाची उर्वरित कामे पूर्ण करावी या मागणीसाठी कोल्हापुर जिल्हाधिकारी कार्यालय समोर बेमुदत उपोषणास सरपंच राजू मगदूम यांच्या नेतृत्वा खाली आंदोलन सुरु करण्यात आले
.माणगाव येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त लंडन हाऊस होलोग्रफी शो जुन्यात तक्याचे लोकार्पण शासनाकडून मार्च 2020 मध्ये करण्याचे ठरले होते पण कोरोनामुळे स्थगित केले त्यानंतर लोकार्पण केल्याने इमारत धुळखात पडली आहे राष्ट्रीय स्मारकाच्या इमारतीभोवती कंपाऊंड महात्मा फुले छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित घटना नदी उर्वरित कामाची लवकरच पूर्तता करावी अन्यथा बेमुदत उपोषणाचा इशारा दिला होता त्याप्रमाणे दिनांक 12 फेबुवारी 2024 पासून सकाळी 11.00 वा उपोषणास प्रारंभ करण्यात आला यामध्ये सरपंच राजू मगदूम उपसरपंच व ग्रामपचायत सदस्य यांनी सहभाग घेतला आहे
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली 21 व 22 मार्च, 1920 रोजी झालेल्या ऐतिहासिक पहिल्या बहीष्कृत वर्गाच्या माणगांव परिषदेस 104 वर्षे पूर्ण झाली आहेत. या ऐतिहासिक स्मारकाचा 169 कोटींचा आराखडा तयार आहे. यापैकी सुरूवातीच्या 2 कोटी 38 लाखांच्या लंडन हाऊस प्रतिकृती, ऐतिहासिक तक्क्या इमारत आणि हॉलोग्राफीक शो व स्वागत कमानीचे लोकार्पण लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत करण्यात येणार होते. पण कोरानामुळे तो कार्यक्रम महाराष्ट्र शासनाने रद्द केला.नियोजित स्मारकाची संकल्पना 1985 मध्ये झाली. 25 जून 2010 रोजी आंबेडकरी चळवळीतील सर्व पक्ष व संघटना यांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर बबन कांबळे यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 25 हजार आंबेडकरी जनतेचा महामोर्चा काढून निवेदन दिले होते. स्मारकाला 2009 मध्ये शासन स्तरावर सुरूवात झाली. तत्कालीन मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी विधीमंडळातील अधिवेशनामध्ये 29 कोटींची तरतूद करीत असल्याबद्दल जाहीर केले. मात्र त्यावेळी जागा संपादनाचे काम झाले नसल्यामुळे ते स्मारक प्रलंबितच राहीले. 2017-18 मध्ये तत्काळ नवीन आराखडा बनवून शासनास सादर करण्याचे निर्देश दिले. त्याप्रमाणे इतिहास संशोधक जयसिंग पवार, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, प्राचार्य हरीष भालेराव, प्रा. कृष्णा किरवले व अनिल कांबळे-माणगांवकर यांनी आराखडा समिती तयार केली. समितीने 169 कोटींचा आराखडा बनवून शासनास सादर केला. स्मारकासाठी माणगांव येथील बौध्द समाज बांधवांनी सुमारे साडे चार एकर जमीन दिली. तात्कालीन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी ती शासनास स्मारकाकरीता म्हणून संपादन केली आहे.