परराज्यातील सराईत घरफोडी चोरट्यास कोल्हापूर एल.सी.बी. ने केली अटक
८ घरफोडीचे गुन्हे उघड सात लाखाचा मुद्देमाल जप्त
अमोल कुरणे
कोल्हापूर, दि. १३ (प्रतिनिधी) कोल्हापूर जिल्ह्यात घरफोडी चोरीच्या गुन्ह्यात वाढ झालेने घडलेले गुन्हे उघडकीस आणून, घडणार्या गुन्ह्यांना प्रतिबंध होण्यासाठी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना मार्गदर्शन करून सुचना केल्या होत्या. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी एल.सी.बी. शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांचे तपास पथक तयार करून घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेचे प्रयत्न चालू असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस अमंलदार सुरेश पाटील, सागर माने व तुकाराम राजीगरे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारां कडून माहिती मिळाली की, कर्नाटक राज्यातील पोलीस रेकॉर्डवरील घरफोडी करणारा गुन्हेगार सुमित महादेव निकम, रा. गजबरवाडी, ता. निपाणी, जि. बेळगाव, राज्य-कर्नाटक याचेकडे चोरीचे सोन्याचे दागिने असून दागिने घेवून तो लोणार वसाहत मार्गे मार्केट यार्ड, कोल्हापूर येथे येणार आहे. अशी माहिती मिळालेने पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांचे मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, पोलीस अंमलदार तुकाराम राजीगरे, सुरेश पाटील, सागर माने यांचे पथकाने लोणार वसाहत ते मार्केट यार्ड, कोल्हापूरात येणार्या रस्त्यावर सापळा रचून आरोपी सुमित महादेव निकम, व.व.२७, रा. गजबरवाडी, ता. निपाणी, जि. बेळगाव, कर्नाटक यास त्याचे ताब्यातील १०७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व ५२० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने असा एकूण ६,७८,४०० किंमतीच्या मुद्देमालासह ताब्यात घेतले.
आरोपीकडून अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत.
आरोपीकडून वरीलप्रमाणे घरफोडी-चोरीचे एकूण ८ गुन्हे उघडकीस आले असून आरोपीस जप्त मुद्देमालासह पुढील तपासकामी मुरगूड पोलीस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आले.
आरोपी सुमित महादेव निकम याचे विरुध्द यापुर्वी महाराष्ट्र राज्यासह कर्नाटक राज्यात जबरी चोरी व घरफोडी चोरीचे सुमारे २० गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे तसेच पोलीस अंमलदार तुकाराम राजीगरे, सुरेश पाटील, सागर माने, आयुब गडकरी, अमित मर्दाने, सुप्रिया कात्रट, यशवंत कुंभार, संजय पडवळ, संतोष पाटील यांनी केली.