उत्स्फूर्त उत्साहात ‘ इनोव्हेट 2k24’ संपन्न:जे. जे. मगदूम इंजिनिअरिंगचा राष्ट्रीय स्तरावरील संशोधनात्मक उपक्रम.
जयसिंगपूर येथील डॉ. जे. जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजीनियरिंग मध्ये ‘ इनोव्हेट 2k24’ राष्ट्रीय स्तरावरील टेक्निकल स्पर्धा पार पडली. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सांगली, येथील लठ्ठे पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा. आण्णासाहेब गाजी होते. जे. जे. मगदूम इंजिनिअरिंग कॉलेजच्या प्राचार्या डॉ. शुभांगी पाटील उपस्थित होत्या.
‘ डिप्लोमा’ अभियांत्रिकी पदविका शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या मध्ये संशोधनात्मक वृत्ती वाढावी, संशोधनात्मक पेटंट्स व कॉपी राईटबद्दल विद्यार्थ्यांच्या उत्सुकतेत वाढ होऊन, संशोधन कार्यासाठी उत्तेजन मिळावे या हेतूने आमचे महाविद्यालय गेली सलग तीन वर्ष या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचे आयोजन करत आहे अशी माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी आपल्या मनोगता मध्ये दिली.
नोकरीसाठी शिक्षण हाच हेतू मनाशी न बाळगता विद्यार्थ्यांनी संशोधनात नाव कमावणे गरजेचे आहे. संशोधनात्मक पेटंटची निर्मिती विद्यार्थ्यांनी केली असता त्याचाही उपयोग चांगल्या प्लेसमेंट साठी होतो असे प्राचार्य अण्णासाहेब गाजी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतेवेळी संबोधले. सलग तीन वर्षे इंजिनिअरिंग कॉलेज हा उपक्रम राबवते आहे. त्यासाठी महाविद्यालयाची स्तुती करण्यासही ते विसरले नाहीत. महाविद्यालयाचा दीर्घ शैक्षणिक अनुभव व अनुभवी प्राध्यापक त्यांच्यामुळेच या गोष्टी शक्य आहेत असेही ते म्हणाले.
‘ इनोव्हेट’ या तंत्रिकदृष्ट्या स्पर्धेचा उद्देश विशद करतेवेळी चालू वर्षी महाराष्ट्रातील पंधराहून अधिक महाविद्यालयातील ५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला आहे अशी माहिती कार्यक्रमाचे आयोजक डीन आर. अँड डी. डॉ. डी. बी. देसाई यांनी दिली.जनरल चॅम्पियनशिप फिरता चषक डी. के.टी. ई. संस्थेचे वाय.सी.पी. कॉलेजनी पटकावला. सदरची स्पर्धा प्रॉब्लेम स्टेटमेंट, टेक्निकल पोस्टर प्रेसेंटेशन, फोटोग्राफी या इव्हेंट्स मध्ये घेण्यात आली.
डॉ. जे. जे. मगदूम ट्रस्टचे चेअरमन डॉ. विजय मगदूम व व्हाईस चेअरपर्सन डॉ. सौ. सोनाली मगदूम त्यांच्या उत्स्फूर्त प्रेरणेतून व कॅम्पस डायरेक्टर डॉ. सुनील आडमुठे यांच्या मार्गदर्शनाखाली डीन आर. अँड डी. च्या सॉर्ट विभागाने स्पर्धेचे आयोजन केले होते.
स्पर्धेच्या नियोजनासाठी सल्लागार म्हणून डॉ. डी.बी. देसाई, फॅकल्टी कॉर्डिनेटर प्रा. ए.एस. पाटील, स्टुडन्ट कॉर्डिनेटर सुदर्शन पाटील यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व विभाग प्रमुख, डीन्स, प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
Posted inकोल्हापूर
उत्स्फूर्त उत्साहात ‘ इनोव्हेट 2k24’ संपन्न:जे. जे. मगदूम इंजिनिअरिंगचा राष्ट्रीय स्तरावरील संशोधनात्मक उपक्रम.
