महाराष्ट्रातील आशा व गटप्रवर्तक महिलांना मानधन वाढ देण्यासंदर्भात त्यांना निराश करणार नाही असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतर आशा गटप्रवर्तक महिलांचा राज्यातील संप स्थगित

महाराष्ट्रातील आशा व गटप्रवर्तक महिलांना मानधन वाढ देण्यासंदर्भात त्यांना निराश करणार नाही असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतर आशा गटप्रवर्तक महिलांचा राज्यातील संप स्थगित

महाराष्ट्रातील आशा व गटप्रवर्तक महिलांना मानधन वाढ देण्यासंदर्भात त्यांना निराश करणार नाही असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतर आशा गटप्रवर्तक महिलांचा राज्यातील संप स्थगित

मुंबई :
*महाराष्ट्रातील 76 हजार आशा व गटप्रवर्तक महिलांनी परत एकदा 12 जानेवारी 2024 पासून बेमुदत संपाला सुरुवात केलेली होती.
संपा बरोबरच ११फेब्रुवारी२०२४ पासून मुंबई आझाद मैदान येथे सलग एक मार्च पर्यंत जोरदार आंदोलन करण्यात आले.
आशा महिलांना दरमहा सात हजार रुपये मानधन वाढ दोन हजार रुपये भाऊबीज आणि गटप्रवर्तक महिलांना दहा हजार रुपये मानधन वाढ आणि भाऊबीज देण्याबाबत आरोग्यमंत्र्यांनी घोषित केलेले होते परंतु आरोग्यमंत्र्यांनी केलेली घोषणा स्वीकारण्यास मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री तयार नसल्यामुळे गेल्या पाच महिन्यापासून हे आंदोलन सातत्याने सुरू आहे.
सध्या महाराष्ट्रामध्ये जनतेला आरोग्य सुविधा पुरवण्यासंदर्भात बजेटमध्ये तरतूद अत्यंत कमी म्हणजे चार टक्के आहे ती आठ टक्के करावी म्हणजे जनतेला आरोग्य सुविधा देणे आणि काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना योग्य वेतन देऊन रिक्त पदे भरणे या गोष्टी सहज शक्य होतील.
परंतु या अंदाजपत्रकामध्ये आरोग्य विषयक कसलेही जादा तरतूद महाराष्ट्र शासनाने केलेली नाही.
एक मार्च 2024 पासून राज्यातील सर्व आशा व गटप्रवर्तक महिलांनी पूर्ववत कामावर जावे अशा पद्धतीचा निर्णय महाराष्ट्र राज्य अशा गटप्रवर्तक कामगार संयुक्त कामगार संघटनेच्या वतीने घेण्यात आलेला आहे.त्यानुसार प्रक्रिया सुरू झालेली आहे दरम्यान या संदर्भात सांगली जिल्ह्यातील प्रमुख अशा गटप्रवर्तक महिलांना एकत्रित करून त्यांचे बैठक घेण्यात आली बैठकीमध्ये असा निर्णय घेण्यात आलेला आहे की जिल्ह्यातील सर्व आशा आणि गटप्रवर्तक महिलांना मानधन वाढीच्या लढ्याबद्दल ची माहिती देणे आणि आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त माहिती देणे यासाठी 9 मार्च रोजी ठीक सकाळी 11 वाजता सांगली निवारा भवन येथे मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे या मेळाव्यास ज्येष्ठ कामगार नेते काँ शंकर पुजारी हे मार्गदर्शन करणार आहेत तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त अशा गटप्रवर्तक महिला आशा गटप्रवर्तक महिला व बांधकाम क्षेत्रातील महिलांनी मोठ्या संख्येने जमावे असे आवाहन करणारे पत्र कॉ सुमन पुजारी जनरल सेक्रेटरी महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक आरोग्य कर्मचारी संघटना यांनी प्रसिद्धीस दिलेली आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *