संगीत स्वरांचे गूढ जग
सापेक्ष आनंदाचा प्रवास…..
(माझे संगीत प्रेम(
संगीत हे मन वेड आहे.संगीत मनाचा कल्लोळ शांत करणारे स्वरांचे खेळ असतात. कल्लोळ उभा ही करणारे संगीत असते. व्यक्ती आणि संगीत यांचे पूर्व नातेच त्यांचा वर्तमान अविष्कार आणि श्रोता या पातळीवर समृद्ध होत राहत संगीताचा आनंद ही व्यक्त न करता येणारे पण बौद्धिक दृष्ट्या समाधान देणारे अव्यक्त गोष्ट आहे. या संगीताचे इतके गारुड मनावर का प्रस्थापित होते ?याचा विचार संगीत श्रोता क्वचितच करतो पण आनंद देणारी गोष्ट ही तपासणे हे अधिक आनंदी होणे आहे आनंद ही मनोभावना आहे. बुद्धीतील विधायक शांत चेताकेंद्रे ही श्रवणाकडे आकृष्ट होतात मनाची स्वरांबरोबर असलेली साथसंघात हा निर्माण आनंद असतो हे आनंदाचे अंतरंग श्रोताम्हणून कलावंत म्हणून समजावून घेण्याचा प्रयत्न करीत राहणे. हे संगीताच्या खेळांबरोबर अधिक खेळत राहणे आहे.
संगीताला अनेक कलेमध्ये गुढ व श्रेष्ठ कला मानण्याची रीत निर्माण झाली आहे. गुढ जिथे असते तेथे विचार शक्तीला व्यक्तीने स्वतःहून पूर्णविराम दिलेला असतो आणि म्हणूनच गुढ हे बुद्धीवर बुद्धीच्या सर्व कारण क्रियेवर ते परिणाम करते संगीत ही शक्ती आहे .संगीत अव्यक्त कला आहे श्रवण आनंदाची निर्मिती आहे असे सर्व काही संगीताचे व्याख्याकित स्वरूप अनेक जण करीत असतात. पण आपलासंगीत आनंद ही एक सापेक्ष आकलनबद्ध आणि संगीताच्या श्रवण सातत्यावर विकसित जाणारी आनंद प्रक्रिया आहे .यामध्ये अनेक कारण घटकांचा समावेश आहे त्यासाठीअसे संगीत समजावून घेणे ही आणखीनअपूर्व गोष्ट आहे.
स्वर कळावे लागतात राग नाहीच असाव्या लागतात साज समजावा लागतो संगीताच्या दरबारातील गायकाचा आवाज महाराजा किती महत्त्वपूर्ण आहे. हे जेव्हा कळते तेव्हा संगीताच्या श्रवण आनंदापर्यंत पोहोचता येते मानवी आवाज गीतांची रचना त्यातील व्यंजनांची संख्या त्यासाठी भावनानुसार वेळेनुसार निर्माण झालेले राग ही मोठी संगीत क्षेत्रातील मानव जातीची चालत आलेली संचित गोष्ट आहे .जगातील संस्कृतीने वेगवेगळे संगीताचे साज त्यासाठीची वाद्य तयार केले आहेत त्याबरोबर तेथे मानवी समूह सरांच्या सोबत जीवन आनंद घेत राहतात .हे सर्व अद्भुत आहे आपण संगीत ऐकतो तेव्हा साधनांचा साज ऐकतो साजाच्या अंतरीक लपेटलेला स्वरा ऐकतो सरांच्या खोल उंच गतिमान ताना ऐकतो इथेच आपले गायक आणि श्रोता यांच्या संमोहनाचा खेळ सुरू होतो .मुळात संगीत ही एक स्वरांची लपंडाव चाललेली खेळ क्रियाच असते इथे स्वर पुढे जातात शब्द सोबत येतात साज या सर्वांना एकत्रित घेऊन सोबत येत असतो त्यामुळे स्वरांनो या असे सारखे श्रोत्याला वाटत असते संगीत हे शब्द असतात संगीताला शब्दांच्या मधून प्रगट होणाऱ्या भावना असतात भावनांना अचूक अभिव्यक्त करणारा गायक हा हीश्रेष्ठ निर्मात असतो. गायक सरांशी खेळतो स्वतःलाही सोबत पुढे नेतो आणि एक आनंद नाते सुजन अविष्काराचे तयार होते हे श्रवण पातळीवर अनुभव होत असताना कोणता आनंद मिळतो आवाजाचा लायाचा आरोह अवरोहाचा की की गायकांनी निर्माण केलेल्या स्वरांसोबतच्या अधीर भावनेचा आणि व्यक्त होणाऱ्या त्या शब्दांच्या अर्थाचा यामध्ये फरक स्वतः व्यक्तीसापेक्ष वेगवेगळ्या करू शकतो पण संगीताच्या या जादूमय परिणाम व प्रभावाचे भरलेले वातावरण ही श्रोत्यांच्या मनाची रूपांतरित झालेले अवस्था असते.
अनेक राग अनेक प्रकारचे संगीत अनेक प्रकारची गीते अनेक प्रकारच्या मानवी भावभावनांचे अभिव्यक्त होणे हे संगीताचे मोठे आकर्षक साधन साम्राज्य असते. यामध्ये निर्माण स्वरांचे आकर्षण ही एक मोठी वेगळी गोष्ट आहे ती व्यक्तीस अपेक्षा आहे ती सहजाताआहे
माणूस भावना आणि अर्थ यांना पुढे घेऊन जाताना खूप अद्भुत शब्दांना विषयांना ईश्वर भक्तीच स्वरूप प्राप्त करतो सर्व गीते आणि राग मानव जातीच्या भावनांना ते बद्ध करतात इथे मानवी प्रज्ञामध्ये असलेल्या त्या भावनांची जागृती अविस्कृत त्या स्वरांच्या मुळे होत राहते भैरवीचे स्वर भैरवी चे गीत हे त्याचे उदाहरण म्हणून आपणाला घेता येईल. स्वर उंच जातात स्वर थांबतात स्वर गोल फिरतात स्वर वेगाने पुढे चालतात स्वर अचूक समेवर येऊन उभे राहतात आणि इथेच पुन्हा पुन्हा वर्तुळाकार स्वर रागांची क्रीडा मैफिल गायक करीत असतो. हे सर्व सामान्य जरी असले तरी श्रोता आणि एक यांच्या नात्याचा अनुबंध जोडला की ही पुढील मन डोले प्रक्रिया होत राहते कोणत्याही संगीत महफलीला हजर असणारे श्रोते यांची संगीत साक्षरता ही एक मोठी अवघड गोष्ट असते माणसाला कोणती गोष्ट का आवडते हे सांगता येत नाही .आनंदाचे निश्चित एक कारण संगीतात ठरत नाही साज साक्षीची सर्वसाधारण हार्मोनियम तबला व्हायोलिन यासारखे असंख्य साधने यामध्ये श्रोता रम मान व्हायला उपयोग होतो निवेदन हेही घेताना आशयाच्या सोबत पुढे नेते शास्त्रीय संगीतातील सहजता स्वरांची मनभावनांच्या बरोबरची नर्तन क्रिया ही किती महत्त्वाची असते हे गायकाला माहीत असते .त्यामुळे तो हे सारे अविस्कृत स्वरांचे साम्राज्य त्यामुळे मैफिलीत तो तयार करीत असतो. आपल्या आनंदाला मात्र इथेच प्रारंभ होत असतो आपला आनंद ही एक पूर्व निश्चिती असते पूर्व निवड असते काहीतरी पूर्व ऐकलेल्या श्रवणाचे ते पुढील सातत्य स्वरूप असते आणि त्यातूनच अमुक घराण्याचे अमुक गायक आवडतात त्यांचा तो अमुक राग आवडतो अशी प्रतिक्रिया श्रोता देत असतो पण यामध्ये श्रोत्यांची संगीत साक्षरता ही वादग्रस्त असते तरीही अभिजनांच्या संगीत मैफिलींना खूप महत्त्व दिले जाते सादरकर्त्या गायकाच्या कलेला मानाडो लावणारा वर्ग हा खूप महत्त्वाचा असतो आपले गायक आपली घराणे आपले अभंग आपले राग यांचे सादरीकरण आणि त्यासाठीचा निर्माण केलेला मन डोले रे चा श्रोता हाच संगीताचे महात्म्य वाढवत राहतो श्रोता असल्यामुळे कलावंतांना महत्त्व असते या उलट आज कलावंतामुळे श्रोते येतात असेच घडवून येते संगीत ही थोडी समज थोडी ओळख असलेल्या स्वराच्याच्या रागांच्या समजेचा खेळ आहे
संगीताचा मनावर होणारा परिणाम हा एक सतत निष्कर्ष नोंदविता येणारा घटक असतो मानवी मनाच्या भावअवस्था सतत बदलतात या बदलांना स्वरांमध्ये बद्ध करणारे संगीत जगतातील इतिहास पासून चालत आलेली ही साधना हे मानवी प्रज्ञाचे मोठे पुढील पिढ्यांसाठीचे आनंद योगदान आहे .मन अस्थिर भावनाबद्ध गतिमान असते या मनाला सारे कल्लोळ थांबवून स्थिर करणारे संगीताचे अविस्कृत स्वरूप ही गोष्ट मनाच्या आनंदासाठी खूप महत्त्वाचे आहे अध्यात्माचे प्राबल्य भक्तीची भाव अवस्था यांना खूप गूढ वादाकडे संगीतातील लोक नेह तात संगीत ही आध्यात्मिक कला आहे आत्मिक संवाद आहे असे जेव्हा सुरू होते तेव्हा हा सगळा मनोभ्रमाचा संमोहनाचा प्रयत्न वर्तमान चालू असतो असे निश्चित मानावे माणसाला गुढतेचे का असते? या प्रश्नाचे उत्तर ज्ञानाचे विश्लेषण आनंदाचे विश्लेषण कारणांचा परिणाम हे सांगण्यामध्ये मानवी प्रज्ञा ही थिठीहोते इथेच गुढ ता सर्वांना व्यापून राहते ती सर्वांना निरुत्तर करते म्हणून संगीत क्षेत्रामध्ये आध्यात्मिक वारसा आवाज शक्ती अशा स्वरूपाच्या भयकरी शब्दांचा वापर करून महात्म्य कथन करण्याचा प्रयत्न इतिहास काळापासून वर्तमानात पर्यंत चालत आलेले आहे यासाठी व्यक्ती घराणे जाती आणि वर्ग हे वेगवेगळे असतील पण या मानवी प्रवृत्तीचे वर्तन पुन्हा पुन्हा पहावयास मिळते म्हणून संगीत आनंद कल्लोळ शांतता मन भावकता आशय आणि स्वरखेळ साज आणि संघात आवाज आणि त्याचे केंद्रीय स्थान इतपत पूरक घटकांची माहिती असलेल्या श्रोत्याला आनंदाचे अवकाश सहज प्राप्त होऊ शकते सभोवताली असंख्य आवाज सहजता त्यातील भावनांची उच्च कोटीची अविष्कृत अवस्था ही सुद्धा मानवी मनाला खेचून घेते इथेच जादूमुळे आवाजाचे व श्रोत्यांचे नाते जोडता येते सहजतेतील स्वरांचे साज खेळ ही संगीत आनंदाची श्रवण आनंदाची मोठी उपलब्ध आहे
संगीत श्रवण ही शांतता आहे ही मनाची निवांत अधीर अवस्था आहे आज कोलाहल कल्लोळ गलका वाढत चाललेला आहे मानवी विकार कमी होताना दिसत नाही संगीतात विकारांचे निरसन त्या क्षणापुरते तरी होत असते विचारांची चेतन स्वरूपही संगीतातून त्या शृगरातून
होत असते हा सर्व व्यापक संचित परिणाम हाच जादूमय संगीताचा खेळ आपण आपणास सर्वांना आनंदाकडे घेऊन जात असतो. आपण खूप काही खोल मनाच्या जाण्याचा प्रयत्न करत नाही जे करत असतील त्यांना या आनंदाची प्रचिती येतच असेल पण सहजतेतील मन शांतता ही सर्वांना साध्य होणारे गोष्ट आहे ही आनंदाची आहे मनशांतीची आहे विकार निरसनाची आहे. आणि स्वतःच शून्यत्व प्राप्त करण्याची आहे हे सारे स्वरांचे अर्थांचे परिणाम करणारे आकलन वाढवत राहणे हे माझे तुमचे सर्वांचे संगीत प्रेम ठरते.
संगीत प्रेमाला अधिक व्यापकता स्वर सृजनाच्या आधारे येत असते पण मानवी प्रज्ञा तिचा विकास तिची क्षमता तिची स्थिरता ही भिन्न भिन्न असल्यामुळे संगीत प्रेमाचा अनुकरणीय विकास हा कितीही झाला तरीही तो कलाविकास म्हणून मानता येणार नाही. संगीतकलेचा साक्षरतेचा प्रवास व्हायला हवा श्रोता आणि कलावंत यांचे श्रवण नातेच हेच सतत वाढत राहणे यातूनच संगीत प्रेमींचे जग निर्माण करता येईल आज माणूस स्वरांच्या शोधात निघाला आहे त्याला गतीने स्थिरतेचे महत्व सांगण्याचा प्रयत्न केला आहे. असंख्य स्वरूपाच्या क्षोभकारी भावना यामुळे अनेक जनसमुहाचे मन शांतता शोधत आहे त्याच साठी संगीतांच्या स्वर दुनियेत अधून मधून फेरफटका आपण मारायला हवा शांत होता व्हायला हवे मन डोलवता आली नाही तरी ऐकायला हवे ही सारी संगीत साधना श्रोता पातळीवर सुद्धा असते त्यासाठी मन मारून ऐकावे लागते. हे ऐकणेच माणसाच्या मनाचे विकसन स्वरूप असते मनाची स्वरांसोबत अव्यक्त असलेली साथ ती सोबत कोणता अनामिक आनंद देते याची वर्गवारी अनेकांना करता येईल पण आपणाला हे वर्गीकरण करता येणार नाही तरीही बौद्धिक पातळीवर भावनांची संपृप्तता संगीत प्राप्त करून देते त्यासाठी ते एक तारी चे भजन असो गजलांची मैत्री असो रागदारी असो घराण्याची जुगलबंदी असो प्रचंड गायकांनी केलेली साधना असो हे सर्व खूप श्रोत्यांना यांना प्रभावित करून जाते.
संगीतात विषमता संगीतात प्रभुत्व आहे संगीतात वर्णव्यवस्था तशी साधने तशी गीते तसा अध्यात्मवाद सर्व संस्कृतीचे दुष्परिणाम यामध्ये आहेतच पण तरीही मानवी मनाची निरसन अवस्था आनंदाचे भान व आनंद संचित निर्माण करणारी संगीतकला शास्त्रीय संगीताचे प्रभुत्व आपण स्वीकारायला हवे सहजता स्वरांची सहजता साधनांची सहजता अभिव्यक्तीची गायनाची हे सर्व स्वीकारणारे असंख्य मानवी जनसमूह अद्याप इथे तयार व्हायचे आहेत .संगीताचीसाक्षरता मोठ्या प्रमाणात अद्याप वाढली आहे असे म्हणता येत नाही संगीत उत्सव संगीताचे कार्यक्रम हे कलावंतांच्या त्यासोबत श्रोत्यांच्या गरजेच्या सादरीकरणासाठी होतात आयोजनाच्या आनंद साठे होतात यातूनच संगीताचे पर्यावरण सातत्याने मानवी संस्कृतीचा आनंददायी प्रवास म्हणून तयार करायला हवे संगीत ऐकायला हवे संगीतासाठी वेळ द्यायला हवा संगीताचे भिन्न भिन्न प्रकार या सर्व विश्वात रमायला हवे हाय एक शब्दबद्ध न करता न येणाराआनंद
निश्चित आहे याची प्रतवारी याचा स्तर भिन्न भिन्न असला तरीही काही बिघडत नाही.
माझे संगीत प्रेम बासरीतून सुरू होऊन काही इयत्तेपर्यंतच थांबले. माझे संगीत प्रेम तबल्यांचे काही धडे घेऊन संपले हार्मोनियम वायोलिन या साधनांचे संग्रह प्रेम हे आहे पण स्वयं सुजन अविष्कार नाही त्यामुळे खूप बिघडत नाही खूप साध्याही होत नाही पण सहज साध्यता ही सुद्धा कमी नसते ती आनंदाच्या भावभावनांना समृद्ध करून जाते जीवनाचा आनंद वेधक आवाजात विहारात स्वरांच्याच्या ग्रहणात असतो इथेच मन वेड आकर्षित होते इथेच आनंदाचा प्रारंभ होतो आनंदही स्वयंनिर्मिती निवड आणि निश्चित ठरवून केलेली प्राप्ती सुद्धा असते इतकी आनंद साक्षरता स्वर संगीताच्या सोबत पुढे पुढे विकसित व्हायला हवी रागांच्या अंतरंगात त्यांच्या गुहेत आणि इतिहासात जाणारे स्थिर मन मात्र करायला हवे आणि इतर कलांच्या मधील शोधा शोध थांबवायला हवी तरच संगीत ही गुढता नाही. संगीत हे अध्यात्म नाही. संगीत हा दैवी शक्तीचा वारसा नाही तर सहजतेचे आनंद पर्यावरण ही मनाची सन्मुख अधीरता आहे हे निश्चित हे सर्व संमोहनाच्या खेळापैकी एक आहे एवढे तरी आपणाला थोडे समजले आहे असे मानता येते.
टीप कोणत्याही गायकाच्या इतिहासाचे, कोणत्याही घराण्यांच् उद्दाती करण करता ,कोणत्याही रागाचं विश्लेषण नकरता, इतिहासाचे दाखले न देता ही केलेली ही संगीत श्रवण साक्षरता आहे.
शिवाजी आर
सातारा दिनाक 9 वेळ 7.54